घरमनोरंजन‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्काराच्या मागणीनंतर आता करीनाने दिली प्रतिक्रिया

‘लाल सिंह चड्ढा’च्या बहिष्काराच्या मागणीनंतर आता करीनाने दिली प्रतिक्रिया

Subscribe

आमिर खाननंतर करीनाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करीनाने म्हटलं की, आजच्या काळात आवाज उठवण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. सगळ्यांचं आपंल स्वताःचं मत आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान ४ वर्षाच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या माध्यमातून दिसणार आहे. सध्या सगळीकडेच आमिर खानच्या या चित्रपटाती चर्चा सुरू आहे. अनेक दिवसांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’वर आता बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. नुकत्याच एक दोन दिवसांपूर्वी आमिर खानने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली होती. आमिरनंतर आता अभिनेत्री करिना कपूर देखील आपलं मत मांडताना दिसत आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर बहिष्कार
११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत सध्या सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सध्या ट्वीटरवर #BoycottLaalSinghChaddha हे ट्रेंड करत आहे. आमिर खान आणि करीना कपूरच्या या चित्रपटावर बहिष्काराची मागणी केली जात आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बहिष्कार टाकला जात आहे. यादरम्यान, आमिर खाननंतर करीनाने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करीनाने म्हटलं की, “आजच्या काळात आवाज उठवण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. सगळ्यांचं आपंल स्वताःचं मत आहे. तर मग आता, असं काही होणार असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हवं. नाहीतर तुमचं जगणं मुश्किल होईल आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींकडे एखाढ्या गांभिर्याने पाहत नाही.”

- Advertisement -

आमिर खानने सुद्धा दिली होती प्रतिक्रिया
आमिर खानने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, “काही लोकांना वाटतं मला भारत आवडत नाही. मला खूप दुःख होतं, जेव्हा लोक माझ्या चित्रपटांवर अशाप्रकारे बहिष्कार टाकतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, ते जो विचार करत आहेत, तो पूर्ण चुकिचा आहे. माझी त्यांना विनंती आहे की, माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये आणि त्याला नक्की पाहा.”

‘लाल सिंह चड्ढा’ लवकरच होणार प्रदर्शित
आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित, ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.


हेही वाचा :लाल सिंह चड्ढावर का टाकला जातोय बहिष्कार? आमिर खानने केली चित्रपट पाहण्याची विनंती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -