घरताज्या घडामोडीविलेपार्ले येथे कोसळलेल्या झाडाला पुनर्रोपणाद्वारे नवसंजीवनी

विलेपार्ले येथे कोसळलेल्या झाडाला पुनर्रोपणाद्वारे नवसंजीवनी

Subscribe

पश्चिम उपनगरातील विलेपार्ले (पूर्व) येथे पदपथावर असलेले बदामाचे झाड शुक्रवारी अचानक कोसळले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र सदर झाड कोसळल्यानंतरही चांगल्या स्थितीत होते. त्यामुळे उद्यान खात्याने उपलब्ध यंत्रणेचा वापर करून अंधेरी (पूर्व) येथील महापालिकेच्या रमेश मोरे पार्क या उद्यानात तात्काळ पुनर्रोपित करून झाडास नवसंजीवनी दिली आहे.

यासंदर्भातील माहिती उद्यान खात्याचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.पश्चिम उपनगरातील के/पूर्व विभागातील, नेहरू रोड विलेपार्ले (पूर्व) येथील पदपथावरील बदाम जातीचे झाड सोमवारी अचानकपणे कोसळले. मात्र सदर झाड कोसळले असले तरी त्याला वाचविणे शक्य असल्याचे उद्यान खात्याच्या तज्ज्ञांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तत्काळ उद्यान खात्याचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी युद्धपातळीवर हालचाल करून उपलब्ध पालिका यंत्रणेचा वापर करून सदर कोसळलेल्या झाडाला अंधेरी (पूर्व) येथील महापालिकेच्या रमेश मोरे पार्क या उद्यानात तात्काळ पुनर्रोपित करून झाडास जीवनदान दिले.

- Advertisement -

या कामात उप.उद्यान अधिक्षक परी-३ यांचा मोलाचा सहभाग लाभला. तसेच, आता ज्या ठिकाणी सदर झाड कोसळले होते, त्या ठिकाणी नवीन रोपटे लावून, त्याला खतपाणी घालून त्याचे नवीन झाडात रूपांतर करून त्या ठिकाणी एका नवीन झाडाला जन्म देण्याचे काम करण्यात येणार आहे.


हेही वाचा : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज मोठी वाहतूक कोंडी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -