घरताज्या घडामोडीविनायक मेटे यांचं निधन वेदनादायी; शरद पवारांकडून शोक

विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी; शरद पवारांकडून शोक

Subscribe

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरील खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरील खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे. ‘विनायक मेटे यांचं निधन वेदनादायी आहे. सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे’, असे शरद पवार यांनी म्हटले. (NCP Leader Sharad Pawar talks on vinayak mete death)

“विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली. गेली अनेक वर्ष ते मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवत होते. विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केले. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे”, असे शरद पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

“शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या मेटेंचा जन्म झाला. आपल्या लहान गावातून समाजाच्या हितासाठी भूमिका घेण्याचा निर्धार करुन एखादी व्यक्ती राज्य पातळीवर आपला प्रभाव कसा पाडतो याचे उदाहरण म्हणजे विनायक मेटे. आर. आर पाटील मेटेंचे अत्यंत जवळचे सहकारी होते. आणि त्यामुळेच मेटेंनी राष्ट्रवादीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या विधिमंडळात राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं. मराठा आरक्षणासाठी त्यांची आग्रही भूमिका होती. तसेच मुंबईच्या समुद्रात शिवछत्रपतींचे अंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचे व्रत त्यांनी घेतलं होते आणि त्यासाठी ते अखंडपणे काम करत होते”, असेही शरद पवार यांनी म्हटले.

आज मराठा समन्वय समितीची दुपारी बैठक होती. या बैठकीसाठी ते मुंबईकडे येत होते. मुंबईकडे येत असताना त्यांचा अपघात झाला. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोंगराच्या कपारीला धडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली होती. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. विनायक मेटे यांच्या मृत्यूमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या बीडमधील शिवसंग्राम कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – विनायक मेटेंच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -