घरमहाराष्ट्रविनायक मेटे अपघात प्रकरणाची होणार सीआयडी चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आदेश

विनायक मेटे अपघात प्रकरणाची होणार सीआयडी चौकशी, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Subscribe

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री एनकाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकाना दिले.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एम जी एम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती.त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ याना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

- Advertisement -

काय घडले होते –

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. ही घटना सकाळी पाचच्या सुमारास घडली होती. सकाळी 6 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा लगेच त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचा ईसीजी काढण्यात आला, पण तो पूर्णपणे ब्लँक आला. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -