घरठाणेपाऊस आणि खड्ड्यांमुळे एसटीच्या टार्गेटला ब्रेक, फक्त लाखभर प्रवाशांनी केला प्रवास

पाऊस आणि खड्ड्यांमुळे एसटीच्या टार्गेटला ब्रेक, फक्त लाखभर प्रवाशांनी केला प्रवास

Subscribe

एसटीच्या लालपरीतून एक लाख १७ हजार प्रवाशांनी सुरक्षित आणि सुखरुप प्रवास केला. या पावसामुळे उत्पन्नाच्या टार्गेटलाही ब्रेक लागला असेच म्हणावे लागणार आहे.

ठाणे – रक्षाबंधनाच्या सणाला आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळणीसाठी बहिणाबाई आवर्जून माहेरी येतात. तिच्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) नेहमीच सज्ज असते. तसेच यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावाचे निर्बंध नसल्याने ठाणे विभागानेही जय्यत तयारी केली होती. पण ऐनवेळी आलेल्या पावसाने एसटीच्या उत्पन्न वाढीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. तरीसुध्दा एसटीच्या लालपरीतून एक लाख १७ हजार प्रवाशांनी सुरक्षित आणि सुखरुप प्रवास केला. या पावसामुळे उत्पन्नाच्या टार्गेटलाही ब्रेक लागला असेच म्हणावे लागणार आहे. (Due to rain and potholes, the target of ST was broken, only one lakh passengers traveled)

हेही वाचा – घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही; जितेंद्र आव्हडांचा रेल्वे व्यवस्थापकांना इशारा

- Advertisement -

एसटीच्या ठाणे विभागांर्तगत जिल्ह्यातील आठ आगार येत असून तेथून दिवसाला अंदाजे ५३३ बस गाड्या जिल्हा तसेच परजिल्ह्यातही धावतात. त्यामुळे दररोज साधारणपणे १ लाख ७० हजार किलोमीटरचा एसटीच्या बसेसचा प्रवास होतो. यातून एसटीचे रोजचे उत्पन्न हे ७० लाखांच्या आसपास पोहोचले आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्याने रस्त्यावर लालपरी पुन्हा प्रवाशांना आपआपली वाटू लागली. त्यामुळे प्रवासी एसटीकडे वळू लागल्याने आता कुठे एसटीचा गाडा रुळावर येत होता, त्यातच जुलै महिन्यात सातत्याने बसरलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली. त्याचा फटका एसटीला कळत नकळत बसला. त्यामुळे उत्पन्नाचीही घसरण झाली. तद्पूर्वी कोरोना आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचीही झळ चांगलीच बसलेली आहे.

ब्रेक लागण्यास कारण काय?

  • अतिमुसळधार पाऊस
  • पावसामुळे रस्त्यावर तयार झालेले ठिकठिकाणचे खड्डे
  • वाहतूक कोंडी
  • एसटी संप
- Advertisement -

श्रावणातील बहिणभावाच्या अतूट नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाला एसटी विभागाने व्यवस्थित नियोजन केले होते. यावेळी जिल्ह्यांतंर्गत आणि पुणे, सातारा, अहमदनगर या ठिकाणी मुख्य लक्ष केंद्रित केले होते. मात्र रक्षाबंधनाला पावसाने बरोबर हजेरी लावत, एसटीच्या नियोजनावर जणू पाणी फेरले. रक्षाबंधनाला ठाणे विभागाने ९० लाखांच्या उत्पन्नाचे टार्गेट ठेवले असताना फक्त ७८ लाख ९ हजारांवर मजल मारता आली.

  • टार्गेटपेक्षा १२ लाखांचे उत्पन्न कमी
  • या दिवशी १ लाख ८ हजार किलोमीटर प्रवास एकूण झाला
  • ४६१ बसेसमधून १ लाख १७ हजार प्रवाशांनी प्रवास केला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -