घरमनोरंजनहेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' लवकरच होणार प्रदर्शित

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ लवकरच होणार प्रदर्शित

Subscribe

लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 'झिम्मा' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर हेमंत ढोमे यांचा ‘सनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

गेल्या वर्षी 19 नोव्हेंबर ला ‘झिम्मा’ने लोकांना वेड लावले होते तर या वर्षी पुन्हा त्याच शुक्रवारी ‘सनी’ लोकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच ‘झिम्मा’ या सुपरहिट ठरलेल्या सिनेमानंतर हेमंत ढोमे यांचा ‘सनी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झिम्मा’ नंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा अजूनच उंचावल्या आहेत. प्रेक्षकांच्या हयाच अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी बरोबर एक वर्षांनी ‘सनी’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘सनी’ हा सिनेमा 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ललित प्रभाकर यात ‘सनी’ची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ह्या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते असून सिनेमाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केलेले आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक हेमंत ढोमे सिनेमाबद्दल म्हणतात, ” ‘झिम्मा’ ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर प्रेक्षकांशी एक वेगळं नातं तयार झालंय आणि त्या आपुलकीच्या नात्यानेच आम्ही जबाबदारीने ‘सनी’ हा सिनेमा घेऊन आलोय. आपल्या आयुष्याबद्दल चांगलं वाटायला लावणारी ही कथा प्रेक्षकांसमोर आणताना प्रचंड आनंद होतोय. प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे ‘झिम्मा’ला प्रेम दिले तसेच ते ‘सनी’ला हि मिळेल अशी खात्री आहे. ”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -