घरताज्या घडामोडीफडणवीसांनी तुम्हाला 'करुणा' दाखवली'; मुख्यमंत्र्यांचे धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर

फडणवीसांनी तुम्हाला ‘करुणा’ दाखवली’; मुख्यमंत्र्यांचे धनंजय मुंडेंना चोख प्रत्युत्तर

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले. यावेळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहुन घोषणाबाजी केली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी विविध घोषणा देत विरोधकांवर हल्लाबोल केला.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल झाले. यावेळी विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहुन घोषणाबाजी केली. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी विविध घोषणा देत विरोधकांवर हल्लाबोल केला. “आले.. आले.. 50 खोके आले” यांसारख्या अनेक घोषणा धनंजय मुंडे यांनी दिल्या होत्या. त्यांच्या या टीकेवर आज एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत घसा खराब होई पर्यंत बोलत होते. तुमचा सगळा प्रवास मला माहित आहे.

“काही लोक बाहेर फक्त एकच शब्द म्हणतात. ताट वाटी चलो गुवाहाटी. धनंजय मुंडे एवढ्या घोषणा देत होते, जसे काय ते जुने शिवसैनिक आहेत. ते असे बोलत होते बेंबीच्या देटापासून ओरडून. घसा खराब होई पर्यंत बोलत होते. तुमचा सगळा प्रवास मला माहित आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, दया करुणा दाखवली. त्यावेळी निभावली, पण परत-परत दाखवता येणार नाही”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

“धनंजय मुंडे यांच्यावर तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी प्रेम, करुणा सर्व दाखवलं, पण आता ते दाखवत नाहीयेत”, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

धनंजय मुंडे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले होते. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणायची सवय आहे. मला उपमुख्यमंत्री फार वेळा म्हणता येत नाही. एकनाथ शिंदे 40 घेऊन गेले, मुख्यमंत्री झाले. नगरसेवकही शिंदे गटात सहभागी झाले, पण आता नगरसेवक मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. कारण आता जे विधेयक आलं आहे. त्यामुळे नगराध्यक्ष थेट जनतेतून होणार आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

- Advertisement -

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात एकनाथ राहावे, ऐकनाथ राहू नये. मला दु:ख या गोष्टीचे आहे की देवेंद्र फडणवीस विरोधीपक्षनेते होते, ते संविधानिक पद होतं, मात्र आता उपमुख्यमंत्री झाले ते संविधानिक पद नाही. हे बोलत असतना धनंजय मुंडे यांनी अजितदादांची माफी मागितली. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचे मला दु:ख वाटत आहे”, असा टोमणाही धनंजय मुंडे यांनी लगावला.


हेही वाचा – ‘…तो सरकारचा निर्णय असतो’; थेट नगराध्यक्ष निवडणूक विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -