घरमहाराष्ट्र'मोठ्या' साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे पेटून उठलेत, नव्या युतीवरून भाजपाची...

‘मोठ्या’ साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे पेटून उठलेत, नव्या युतीवरून भाजपाची टीका

Subscribe

राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. यासंदर्भात आज संभाजी ब्रिगेड आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त परिषद घेऊन घोषणा केली. संभाजी ब्रिगेडने राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केल्याचीही माहिती शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली. दरम्यान, यावरून आता भाजपाने टीका केली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे सर्व ठिकाणी डिपॉजिट जप्त झाले अशा पक्षासोबत उद्धव ठाकरे जाऊन मिळाले, अशी टीका भाजपा महाराष्ट्राने त्यांच्या ट्विटरवरून केली आहे.

“शिवप्रेमी असल्याने रक्त एकच आहे. दुहीच्या शापाला गाढून टाकू. एकत्र येत नवा इतिहास घडवू. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून युती नाही. तसेच, आमचे हिंदुत्व पटल्याने आम्ही एकत्र येत आहोत. लवकरच महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेणार आहे”,असे उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

- Advertisement -


दरम्यान, या युतीची घोषणा होताच भाजपानेही त्यांच्यावर निशाणा साधला. “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ४० उमेदवार, ४० ठिकाणी डिपॉजिट जप्त. 34786 मते मिळवणाऱ्या पक्षाला उद्धव ठाकरे जाऊन मिळाले आहेत. शिवसेना पक्षाचा त्याग करून ‘मोठ्या’ साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे पेटून उठले आहेत, असा घणाघात भाजपाने केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -