घरताज्या घडामोडीकाँग्रेसला झटक्यावर झटके, दोन वर्षांत चार बडे नेते झाले काँग्रेसमधून 'आझाद'

काँग्रेसला झटक्यावर झटके, दोन वर्षांत चार बडे नेते झाले काँग्रेसमधून ‘आझाद’

Subscribe

काँग्रेस पक्षाला मागील दोन वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कपिल सिब्बल, आनंद शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यानंतर आता काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला दोन वर्षात चार मोठे झटके बसले आहेत.

गुलाब नबी आझाद हे काँग्रेसमधील एका मोठा चेहरा मानले जातात. ते यापूर्वी राज्यसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे आता पक्षातील अनेकांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नियुक्त्यांमध्ये त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जायचा. अलीकडेच नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी बोवलावे होते. यावेळी काँग्रेसने केलेल्या देशव्यापी आंदोलनात आझाद सहभागी झाले होते. मात्र गेल्या काही काळापासून आझाद काँग्रेसवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रातून गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात त्यांना पक्षाचे सदस्यत्व मिळवून दिले होते. यापूर्वी जितिन प्रसाद यांनी गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. पक्षाचे सदस्यत्व घेतल्यानंतर जितीन यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते. ते म्हणाले, आता फक्त भाजप हाच देशहितासाठी काम करणारा पक्ष आहे. बाकीचे पक्ष वैयक्तिक आणि प्रदेशनिहाय झाले आहेत. राष्ट्रीय पक्षाच्या नावाने देशात कोणता पक्ष असेल तर तो फक्त भाजप आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश निवडणूक सुकाणू समितीच्या पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला. सतत बहिष्कार आणि स्वाभिमानी असल्यामुळे होणारा अपमान पाहता माझ्याकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही, असेही आनंद शर्मा यांनी म्हटले.

- Advertisement -

काँग्रेसच्या ‘G23’गटात समाविष्ट असलेल्या नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सक्रिय अध्यक्ष आणि संघटनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्याची मागणी केली होती. राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेसच्या असंतुष्ट G-23 कॅम्पच्या नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर गटाच्या वतीने निवेदन जारी करण्यात आले. या बैठकीत गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, अखिलेश प्रसाद सिंग, शंकर सिंह वाघेला, शशी थरूर, एमए खान, संदीप दीक्षित, विवेक तंखा, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण, राज बब्बर, मणिशंकर अय्यर, पीजे कुरियन, कुलदीप शर्मा उपस्थित होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही राजीनामा दिला होता. कपिल सिब्बल यांनी सपाच्या पाठिंब्याने राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली होती. जितिन प्रसाद यांनी कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेस सोडल्यानंतर खिल्ली उडवली होती. तसेच मध्य प्रदेशात राजकीय उठाव झाल्यानंतर काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला होता. सिंधिया यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हिमाचल प्रदेशातील बलाढ्य नेत्यांमध्ये गणले जाणारे आनंद शर्मा यांच्या आधी जम्मू-काश्मीरचे दिग्गज गुलाम नबी आझाद यांचीही जम्मू-काश्मीर निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु गुलाम नबी आझाद यांनी निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काही तासांनी राजीनामा दिला होता.

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेससाठी हा मोेठा धक्का समजला जात आहे. जे घाबरले ते आझाद झाले, असा खोचक टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यावर लगावला.


हेही वाचा : जे घाबरले ते आझाद.., गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा खोचक टोला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -