घरताज्या घडामोडीराज्यात शिक्षकांची 31 हजार 472 पदे रिक्त, मनपा शाळांची स्थिती काय?

राज्यात शिक्षकांची 31 हजार 472 पदे रिक्त, मनपा शाळांची स्थिती काय?

Subscribe

राज्यातील 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद शाळा आणि छावणी शाळांमध्ये मिळून तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहेत. तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य शाळांमध्ये एकूण मंजूर पदे 2 लाख 45 हजार 591 आहेत. यामध्ये कार्यरत पदे 2 लाख 14 हजार 119 आहेत, तर एकूण रिक्त पदांची संख्या तब्बल 31 हजार 472 आहे.

मनपा शाळांची स्थिती काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळांमध्ये मंजूर पदे 2 लाख 19 हजार 428 आहेत. त्यापैकी 1 लाख 99 हजार 976 पदे कार्यरत आहेत. तर तब्बल 19 हजार 452 पदे रिक्त आहेत. महानगरपालिकांच्या शाळांमध्ये मंजूर पदांची संख्या 19 हजार 960 असून त्यापैकी 8 हजार 862 पदे कार्यरत आहेत. मनपा शाळांमध्ये 11 हजार 98 पदे रिक्त आहेत.

नगरपरिषदांच्या शाळांमध्ये 6 हजार 37 मंजूर पदे असून यापैकी 5 हजार 136 पदे कार्यरत आहेत. तर रिक्त पदे 901 आहेत. त्याचप्रमाणे छावणी शाळांमध्ये मंजूर पदे 166 असून कार्यरत पदे 145 आहेत आणि रिक्त पदे 21 आहेत.

- Advertisement -

शिक्षकांमध्ये संतापाची लाट

राज्यात शिक्षकांची 31 हजारांहून अधिक पदं रिक्त असल्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासन शिक्षकांकडून शाळाबाह्य कामे करून घेत आहे. त्यामुळे बेजार झालेल्या शिक्षकांनी शाळाबाह्य कामातून मुक्तता करा, अशी मागणी करत आंदोलन केले होते.


हेही वाचा : देशातील न्यायव्यवस्था उत्तम रहावी, शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा; जयंत पाटलांचं गणरायाकडे साकडं


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -