घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती, डॉ. सुहास...

मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती, डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ उद्या होणार पूर्ण

Subscribe

मुंबई –  विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा १० सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या रिक्त पदावर कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरु होणार असून  ही प्रक्रिया पूर्ण होण्यास २ ते ३ महिन्याचा वेळ लागणार आहे. त्यामुळे  डॉ.डी.टी शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्य भार देण्यात आला आहे.

शिर्के यांचा परिचय –

- Advertisement -

शिर्के  मुळचे कोल्हापुरातील  हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फे वडगाव येथील आहेत. डी.टी. शिर्के यांनी विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर 1985 पदवी आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 1987 साली सांख्यिकी विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ते 1987 मध्ये सांख्यिकी विभागात CSIR संशोधन सहकारी म्हणून रुजू झाले. त्यानंतर ते 1990 मध्ये सांख्यिकी विभागात रुजू झाले आणि 2005 ते 2015 पर्यंत सांख्यिकी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. सुमारे 30 वर्षांचा अध्यापन आणि 33 वर्षांचा संशोधनाचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

75 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशने  –

- Advertisement -

जवळपास 75 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशने त्यांच्या क्रेडिटवर आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय निधी एजन्सीद्वारे अर्थसहाय्यित 5 संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून  त्यांच्या मार्गदर्शनाखाली 14 विद्यार्थ्यांनी पीएच.डी पूर्ण केली आहे. त्यांनी 50 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला असून सहा आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक –

उत्कृष्ट संशोधक म्हणून, त्यांनी भारतामध्ये आणि भारताबाहेर अनेक परिषदा, कार्यशाळा, अभ्यासक्रमांमध्ये आमंत्रित आणि भाषणे दिली आहेत. त्यांनी शैक्षणिक कारणांसाठी भारतामध्ये तसेच यूएसए, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, जर्मनी, थायलंड, सिंगापूर आणि मलेशिया या देशांना भेटी दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून, त्यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर विविध प्रकारचे संशोधन सहकार्य केले आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -