Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट; पत्नीने केली हनी सिंगकडे 10...

हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा घटस्फोट; पत्नीने केली हनी सिंगकडे 10 कोटींची मागणी

Subscribe

कोरोना काळात शालिनीने पती हनी सिंगवर मारहाण-घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत अवैध संबंध असे अनेक गंभीर आरोप केले होते. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाने आता हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि रॅपर हनी सिंग आणि त्यांची पत्नी शालिनी तलवार हे एकमेकांपासून झले आहेत. त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते. हनी सिंग आणि शालिनी तलवार यांचा विवाह 23 जानेवारी 2011 रोजी दिल्लीतील गुरुद्वारामध्ये शीख रितीरिवाजांनुसार झाला होता. दरम्यान, गेल्या वर्षी शालिनी तलवार यांनी हनी सिंगवर गंभीर आरोप करत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. इतकंच नव्हे तर शालिनीने घटस्फोटासाठी 10 कोटी रुपये मागितले होते.

लग्नानंतर काही वर्षांनी बिनसलं

- Advertisement -

कोरोना काळात शालिनीने पती हनी सिंगवर मारहाण-घरगुती हिंसाचार आणि इतर महिलांसोबत अवैध संबंध असे अनेक गंभीर आरोप केले होते. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाने आता हनी सिंग आणि शालिनी यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली आहे. हनी सिंगपासून वेगळे होण्याच्या बदल्यात शालिनीने जवळपास 10 कोटी रुपयांची मागणी केली होती, मात्र तिला केवळ 1 कोटींवरच समाधान मानावे लागलं आहे. हनी सिंग आणि शालिनी जवळपास 20 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 2011 मध्ये त्यांचे लग्न पार पडले. लग्नाच्या काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या.

हनी सिंगवर अवैध संबंधाचा आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Yo Yo Honey Singh (@yoyohoneysingh)

- Advertisement -

शालिनीने हनी सिंगच्या वडिलांवर तिला अनुचित स्पर्श केल्याचा आरोपही केला होता. आपल्या एफआयआरमध्ये त्यांनी हनी सिंगच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली होती. हनी सिंगवर आरोप करताना शालिनीने दावा केला की, लग्नानंतरही त्याचे इतर महिलांसोबत अवैध संबंध होते. शालिनीने 2021 मध्ये दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. यासोबतच तिने हनी सिंगकडे नुकसानभरपाई म्हणून चक्क 10 कोटी रुपयांची मागणी केली होती.


महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनामुळे बॉलिवूड कलाकार भावूक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -