घरमहाराष्ट्रविद्यार्थ्यांच्या गृहपाठालाच सुट्टी? राज्य सरकारचा लवकरच निर्णय

विद्यार्थ्यांच्या गृहपाठालाच सुट्टी? राज्य सरकारचा लवकरच निर्णय

Subscribe

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याच सगळ्यावर तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून गृहपाठ बंद करण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कारण इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. याच सगळ्यावर तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करून गृहपाठ बंद करण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान राज्य सरकार मागील अनेक दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेताना दिसत आहे.

हे ही वाचा – मुंबईत १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

- Advertisement -

याच संदर्भांत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, हे माझं वैयक्तिक मत आहे की, शाळेतील मुलांवर अभ्यासाचे अधिक ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. त्याचबरोबर गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असू नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना कमी वेळात पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरजच भासणार नाही. पण हा निर्णय मोठा आहे, आणि हे माझं वेचैयक्तिक मत आहे. या संदर्भांत शिक्षक संघटना आणि संस्था चालक त्यांच्याशी यांच्याशी बोलून मग त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा – आदित्य ठाकरेंच्या Z सुरक्षेत निष्काळजीपणा; सरकारी गाड्यांऐवजी खासगी वाहनांमधून प्रवास

- Advertisement -

राज्य सरकारकडून जर का हा निर्णय घेण्यात आला तर शाळेतून घरी आल्यानंतर पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवर जो ताण असतो तो कमी होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि त्यामुळे त्यांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा हा हेतू आहे. आगामी शालेय शिक्षण वर्षात हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणार आहे. पालक शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांना विचारात घेऊन हा गृहपाठ बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात येईल. अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पालक संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरींनी दिली आहे. पण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची उजळणी कशी होणार? या सारखे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

हे ही वाचा – उद्धव ठाकरे जे विचार देतील ते सोनिया गांधींचेच असतील, रामदास कदमांची टीका

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -