घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंच्या Z सुरक्षेत निष्काळजीपणा; सरकारी गाड्यांऐवजी खासगी वाहनांमधून प्रवास

आदित्य ठाकरेंच्या Z सुरक्षेत निष्काळजीपणा; सरकारी गाड्यांऐवजी खासगी वाहनांमधून प्रवास

Subscribe

शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सत्तांतरामुळे होत असलेली पडझड रोखण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. मात्र आदित्य ठाकरेंच्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे. आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही सुरक्षा रक्षक खासगी गाड्यांमधून आल्याचे दिसले, ज्यावरून आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड कुणी केली असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे असल्याचे म्हटले आहे. मात्र सुरक्षेतील निष्काळजीपणाची आता राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगतेय.

आदित्य ठाकरे हे आज दुपारी 12.40 च्या दरम्यान रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि सुरक्षारक्षकही उपस्थित होते. मात्र त्यांना झेड दर्जाची सुरक्षा असतानाही तशी सुरक्षा दिसली नाही, त्यांच्या सुरक्षा ताफ्यात खासगी गाड्य़ा दिसून आल्या, ज्यामुळे राजकीय वर्तुळात राज्य सरकारने आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत तडजोड केल्याची चर्चा रंगतेय.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांना झेड सुरक्षा आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या पोलीस तसंच सुरक्षारक्षकांना पोलिसांची सरकारी गाडी असणं अपेक्षित होती. मात्र ते खासगी गाड्यांमधून आल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.आदित्य ठाकरेंच्या यापूर्वीच्या दौऱ्यात पोलिसांचा फौजफाटा होता, परंतु रत्नागिरी दौऱ्यात सुरक्षारक्षकांना खासगी गाड्या देऊन त्यावर पोलीस असं लेबल लावण्यात आलं आहे.

या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांनी देखील भाष्य केलं आहे. ‘माझ्या सुरक्षेसाठी शिवसैनिक पुरेसे, सुरक्षेपेक्षा फॉक्सॉन प्रकल्प महत्त्वाचा, रिफायनी बाबात दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचे ठाकरे यांनी म्हटलं आहे.


पत्नीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणे बलात्कार आहे की नाही? सुप्रीम कोर्ट पुढच्या वर्षी देणार निर्णय


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -