घरदेश-विदेशEVM मशीन्स ठेवलेल्या खोलीतील CCTV तासभर बंद

EVM मशीन्स ठेवलेल्या खोलीतील CCTV तासभर बंद

Subscribe

उत्तरप्रदेशातील भोपाळ येथे ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या रूममधील वीज पुरवठा खंडित झाल्याची बाब समोेर येत आहे.

EVM मशीन्सवर यापूर्वीच शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामध्ये आता मध्यप्रदेशातील आणखी एका घटनेनं सरकारवर टिका होण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम पाहायाला मिळत आहे. भोपाळ येथे मतदानानंतर ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या रूमधील सीसीटीव्ही तासाभरासाठी बंद झाल्याची बाब एका स्थानिक वेब पोर्टलनं दिली आहे. वीज पुरवठा बंद झाल्यानं रूममधील सीसीटीव्ही बंद पडल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. ३० नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. दरम्यान त्यामुळे आता टिका होऊ लागली असून मशीन्शशी छेडछाड झाल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. भोपाळमधील काही भागांमध्ये तासाभरासाठी विजेचा पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडले. दरम्यान मागील दोन दिवसांपासून या मशीन्स या याच खोलीमध्ये पडून होत्या. त्यामुळे संबंधित लोकांवर कारवाई केली जाईल असं आता स्पष्ट करण्यात आलं आहे.

३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१९ ते ९.३५ वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सीसीटीव्ही देखील बंद होते. दरम्यान या रूमच्या बाहेर दोन सुरक्षारकक्षक देखील तैनात करण्यात आले होते. दरम्यान सुरक्षा रक्षकांनी मात्र मशिन्स सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. यावर काँग्रेसनं मात्र टिका केली आहे. यापूर्वी सरकारवर इव्हीएम मशीनवरून टिका केली जात होती. त्यामध्ये आता पुन्हा एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -