घरमहाराष्ट्रकितीही अफझल आले तरी पर्वा नाही; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

कितीही अफझल आले तरी पर्वा नाही; उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

Subscribe

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याकरता शिवसेनेला उच्च न्यायलायाने परवानगी दिली आहे. तो त्यांचा पहिला विजय मानला जातोय. आज सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत काय निकाल लागणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच शैलीत कार्यकर्त्यांना विश्वास दिला आहे. न्याय आपल्याला मिळणार आणि मिळालाच पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. तसंच, कितीही अफझल आले तरी पर्वा नाही, अशी टीका अमित शहा यांचं नाव न घेता ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “विजय आपलाच होईल, माय भवानीवर माझा विश्वास आहे. आई भवानीची आशीर्वाद असताना कितीही अफझल आले तरी मला पर्वा नाही. दसऱ्याला आपण भेटणारच आहोत, एक चांगली सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आई भवानीवर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे.”

- Advertisement -

“आई भवानीवर माझा विश्वास आहे. त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनाला मी येणारच आहे. मला धाराशिव जिल्ह्याचे कौतुक करायचं आहे कारण कैलासने काय केलं हे सर्वांना माहिती आहे.ओमराजे देखील कसा रक्त पाळतोय हे तुम्ही देखील बघितलंय. तुमच्या आधी जालनाचे लोक आले होते, जालनाची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांना तुम्ही मोठे केले ते खोक्यात गेले. मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाहीये. ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. जर शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता. दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने एक मिळावा इथेच झाला असता. मला फोन येत आहेत कुठेही काही आपलं वाकडं झालेलं नाही. भवानी मातेची कृपा आहे. ती कृपा नाही तर खरे कोण आणि चुकीचे कोण हे दाखवून दिलंय. शिवाजी महाराजांना भवानी मातेने तशी तलवार दिली अशी श्रद्धा आहे. तसंच तुमच्याकडे बघून मला असं वाटतंय की भवानी मातेने मला ही तलवार दिली आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपस्थित कार्यकर्त्यांना स्फूरण चढवलं.

- Advertisement -

दरम्यान, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आज शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेवरील दाव्याच्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. गेल्या सुनावणीत न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले होते की, या प्रकरणी निवडणूक आयोगाची व्याप्ती कशी ठरवता येईल हा प्रश्न आहे. मात्र निवडणूक आयोगाने पुढे जायचे की नाही, असा प्रश्न असल्यास त्या अर्जावर विचार करता येईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -