घरमहाराष्ट्रभिवंडीतील धोकादायक संरक्षक भिंत लहान मुलांवर कोसळली, सहाजण जखमी

भिवंडीतील धोकादायक संरक्षक भिंत लहान मुलांवर कोसळली, सहाजण जखमी

Subscribe

 भिवंडी – भिवंडीमधील एका मंगल कार्यालयातील धोकादायक संरक्षक भिंत कोसळून सहाजण जखमी झाले आहे. धोकादायक भिंतीचे पाडकाम सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. जखमींवर भिवंडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या मुख्य अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना सीबीआयकडून अटक

- Advertisement -

भिवंडीतील चव्हाण कॉलनी परिसरात हा अपघात घडला. येथील खुल्या मैदानात गरीब नवाज हॉल आहे. या हॉलची संरक्षक भिंत धोकादायक ठरल्याने महानगरपालिकेकडून खासगी कंत्राटदाराकाडून पाडण्याचे काम सुरू होते. मात्र, यावेळी भिंत अचानक पलीकडच्या बाजूला कोसळली. त्यावेळी तेथे तीन लहान मुलं खेळत होती. त्यामुळे या अपघातात तीन लहान मुले आणि तेथून जाणाऱ्या तिघेजण असे मिळून सहाजण जखमी झाले आहे. अलीशा (वय 3), नाझिया शेख (वय 17) , निजामुद्दीन अन्सारी (वय 60) वर्ष, फैजान (वय 8), जैनाब अजहर खान (वय 4) आणि एक सत्तर वर्षाची वृद्ध महिला अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सुरुवातीला शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका

- Advertisement -

या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महानगर पालिकेच्या बेकायदा कारभाराचा निषेध नोंदवला आहे. धोकादायक संरक्षक भिंत पाडताना पालिकेने कोणतीच नोटीस दिलेली नसल्याचाही आरोप करण्यात येतोय. त्यामुळे जखमींवरील उपचाराचा खर्च पालिकेने द्यावा, अशी मागणी येथील माजी नगरसेवक अरुण राऊत यांनी केलाय.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -