घरताज्या घडामोडीबीआयटी चाळीतील रहिवाशांना ५०० चौ.फुटांचे घरे देण्याची शिवसेनेची मागणी

बीआयटी चाळीतील रहिवाशांना ५०० चौ.फुटांचे घरे देण्याची शिवसेनेची मागणी

Subscribe

‘बीडीडी’ चाळींच्या धर्तीवर मुंबईतील ‘बीआयटी’ चाळींचाही पुनर्विकास करून रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांची घरे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : ‘बीडीडी’ चाळींच्या धर्तीवर मुंबईतील ‘बीआयटी’ चाळींचाही पुनर्विकास करून रहिवाशांना किमान ५०० चौरस फुटांची घरे देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते मनोज जामसुतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. (Shiv Sena demand to give 500 sq ft houses to the residents of BIT Chawl)

मुंबईत माझगाव, ताडवाडी येथे – १६, लव्हलेन – ३, चिंचबंदर – ७, मांडवी, कोळीवाडा – ५, मुंबई सेंट्रल – १९, आग्रीपाडा – २४, परळ – ६ आदी विविध ठिकाणी बीआयटी चाळी आहेत.

- Advertisement -

या चाळी ७० – १०० वर्षे जुन्या आहेत. अनेक चाळी एक मजली, दुमजली आहेत. तर काही चाळी धोकादायक स्थितीत असून मोडकळीस आल्या आहेत. या चाळीत पोलीस, पालिका कर्मचारी व भाडेकरू, असे हजारो लोक जुन्या बीआयटी चाळीत जीव मुठीत धरून राहत आहेत.

माझगाव ताडवाडी बीआयटी चाळ क्रमांक १४, १५ व १६ या इमारतीमधील घरे धोकादायक स्थितीत असल्याने २२० घरातील लोकांना ६ वर्षांपूर्वीच माहुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती मनोज जामसुतकर यांनी दिली.

- Advertisement -

मुंबईतील वरळी, नायगाव व डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार, म्हाडामार्फत सदर चाळींचा पुनर्विकास होत आहे. त्यामुळे तेथील भाडेकरूंना मालकी हक्काची ५०० चौ. फुटांची घरे मोफत मिळणार आहेत. तसेच, वर्षनुवर्षे धोकादायक चाळीत राहणा-या पोलीस बांधवांना १५ लाखात मालकी हक्काची घरे मिळणार आहेत.

त्याच धर्तीवर मुंबईतील बीआयटी चाळींसाठीही पुनर्विकासाकरीता धोरणात्मक निर्णय लागू करावा व सदर चाळींचा पुनर्विकास करावा, जेणेकरून हजारो भाडेकरूंना व पालिका कर्मचाऱ्यांना ५०० चौ. फुटाची मालकी हक्काची मोफत घरे मिळतील. तसेच, बीआयटी चाळीतील पोलिसांनाही मालकी हक्काची घरे मिळू शकतील, असे मनोज जामसुतकर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – जागतिक बँकेतील नोकरीसाठी 23 वर्षीय तरुणाने केले 80 कॉल आणि 600 ईमेल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -