घरपालघरअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत:गोठ्यात

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत:गोठ्यात

Subscribe

येत्या दोन ते चार दिवसांमध्ये शंभर टक्के गाय व बैलांना लसीकरण करण्याच्या सूचना अतिरिक्त सीईओ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील पोशेरा गावात पशुपालकांच्या गोठ्यांमध्ये प्रवेश करत स्वतः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडून गायी व बैलांना लंपी या आजाराचे लसीकरण करून घेतले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या या कृतीने ग्रामस्थांना आनंद झाला असून रविंद्र शिंदे यांचे आभार मानले आहेत. येत्या दोन ते चार दिवसांमध्ये शंभर टक्के गाय व बैलांना लसीकरण करण्याच्या सूचना अतिरिक्त सीईओ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.याबाबत हलगर्जीपणा झाल्यास कोणतीही सबब वा कारण ऐकून घेतले जाणार नाही असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत.आतापर्यंत तालुक्यातील किती जनावरांना लसीकरण झाले आहे, याचा विस्तृत आढावा शिंदे यांनी घेतला. यावेळी मोखाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहीम,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,नियमित लसीकरण, आरोग्य इमारतीचे बांधकाम, तालुक्यातील आरोग्य विभागातील मंजूर पदे,कार्यरत पदे व रिक्त पदे यांचा शिंदे यांनी आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी पंचायत समिती मोखाडा येथे पोहोचत पंचायत समितीच्या विविध विभागांचा आढावा घेतला. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानाचा देखील त्यांनी विस्तृत आढावा घेतला. यावेळी सीडीपीओ कुलदीप जाधव,गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब चत्तर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालचिम,पर्यवेक्षिका सुवर्णा पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -