घरक्राइमदहीहंडीच्या भांडणातून कांदिवलीत दोघांकडून फायरिंग; एकाचा मृत्यू, 3 जण जखमी

दहीहंडीच्या भांडणातून कांदिवलीत दोघांकडून फायरिंग; एकाचा मृत्यू, 3 जण जखमी

Subscribe

मुंबईतील कांदिवली परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. बाईकवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायरिंग केले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईतील कांदिवली परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. बाईकवरून आलेल्या 2 जणांनी 4 राऊंड फायरिंग केले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीसांनी धाव अधिक तपास केला. सध्या आरोपी फरार असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. (Firing In Kandivali 1 Dead 3 Injured In Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, अंकित यादव असे गोळीबाराच्या 4 राऊंडमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अभिनास दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी उर्वरित 3 जखमींची नावे आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाला. कांदिवली येथे बाईकवरून आलेल्या 2 तरुणांनी अचानक गोळीबार सुरू केला. या गोळीबारात चार जणांना गोळी लागली, त्यात एकाचा मृत्यू झाला. उर्वरित 3 जखमी तरुणांवर जवळच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, दहीहंडीच्या वादातून 4 राऊंड गोळीबार झाल्याचे समजते. तसेच, गोळीबारानंतर या भागातील माजी नगरसेवक कमलेश यादव यांनी गोळी झाडणारी व्यक्ती आणि घटनेतील पीडित व्यक्ती एकमेकांना ओळखत असल्याचे सांगितले.

याशिवाय, बाईकवरून आलेल्या तरूणांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते. मात्र, या गोळीमाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

- Advertisement -

हेही वाचा – भारतात ‘Xiaomi’वर ईडीची मोठी कारवाई; कंपनीचा 5551 कोटी रुपयांचा निधी गोठवणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -