घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका, आत्मघातकी स्फोट घडवण्याची धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका, आत्मघातकी स्फोट घडवण्याची धमकी

Subscribe

काही दिवसांपूर्वी देशातील पीएफआय संघटनेवर केंद्राने बंदी लादली. या बंदीचं एकनाथ शिंदे यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मिळालेली धमकी पीएफचं समर्थन केल्यामुळे मिळाली असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुंबईला उडवून देण्याची धमकी मिळत असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आत्मघातकी स्फोट घडवून एकनाथ शिंदेंविरोधात कट रचला असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. दरम्यान, याआधी आषाढी एकादशीलाही त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचा फोन आला होता.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरक्षाव्यवस्था नाकारली होती. मात्र, शासकीय नियमानुसार त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. दरम्यान त्यांना आता धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा आणखी सक्रीय झाल्या आहेत. तसंच, आता त्यांची सुरक्षा आणखी चोख करण्यात येणार असल्याचं समजत आहे.

- Advertisement -

एकनाथ  शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी तिथे ऑपरेशन राबवले होते. या ऑपरेशनदरम्यान अनेक नक्षलींचा यात जीव गेला होता. त्याविरोधात अनेक नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा ठेवला आहे. यातूनच आषाढी एकादशीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे पंढरपूरला असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांना धमकी मिळाल्याने चिंता व्यक्त केली जाते.

काही दिवसांपूर्वी देशातील पीएफआय संघटनेवर केंद्राने बंदी लादली. या बंदीचं एकनाथ शिंदे यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मिळालेली धमकी पीएफचं समर्थन केल्यामुळे मिळाली असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

५ ऑक्टोबरला शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर भव्य दसरा मेळावा होणार आहे. याकरता लाखोंहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी दाखल होणार आहेत. या कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नयेत याकरता पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर फार कमी अॅक्सेस ठेवले जाणार असल्याचंही सांगण्यात येतंय. मेळाव्यादिवशी व्यासपीठावर मोजक्याच लोकांना बसवण्याची शक्यता आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -