घरताज्या घडामोडीकोल्हापुरात कुस्तीच्या सरावावेळी 23 वर्षीय पेहलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापुरात कुस्तीच्या सरावावेळी 23 वर्षीय पेहलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

गेल्या अनेक वर्षापासून मारूती सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. सोमवारी संध्याकाळी सरावानंतर मारूती रूमवर आला. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कुस्तीचा सराव करताना एका पहिलवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. मारूती सुरवसे असे या मृत झालेल्या पेहलवानाचे नाव आहे. मारूती सुरवसे हा पंढरपूर जवळील वाखरी येथे राहणारा रहिवासी होता. (Heart Attack Death of Kolhapur Pailwan Practice)

गेल्या अनेक वर्षापासून मारूती सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत होता. सोमवारी संध्याकाळी सरावानंतर मारूती रूमवर आला. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्या मित्राने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मारूती सुरवसे याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. मारूती सुरवसे याचे वडील शेतकरी होते. त्याच्या मृत्यूने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर कोरोनानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून अनेक तरूण हृदयविकाराने मृत्यूमुखी पडले आहेत.

तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक तरूणांना हृदयविकाराने आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही महिन्यांत अशा अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. विशेषत: 20 ते 25 वर्षीय तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढल्याचे पाहायाला मिळत आहे.

- Advertisement -

नालासोपारा – विरारमध्ये सोसायटीच्या आवारात गरबा खेळताना एका तरुणाचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. तर डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या वडिलांनाही हृदयविकाराचा झटका आला. या घटनेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच वडील व मुलाचे निधन झाले आहे.

शनिवारी रात्री गरबा खेळताना मनीष जैन (35) या तरुणाला अस्वस्थ वाटल्यानंतर उलटी झाली. त्याला उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर मेडिकलच्या समोरच मनिष हा जमिनीवर पडला. हे रिक्षातून आलेले त्याचे वडील नरपत जैन (65) यानांही रिक्षातच चक्कर आली. नातेवाईक आणि इमारतींमधील नागरिकांनी दोघांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यावर तेथील डॉक्टरांनी तपासून हृदयविकाराचा झटक्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.


हेही वाचा – नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरब्याला गुजरातमध्ये गालबोट; तुफान दगडफेकीत 6 जण जखमी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -