घरदेश-विदेशआम्ही भारत माता की जय म्हणणारच - मोदी

आम्ही भारत माता की जय म्हणणारच – मोदी

Subscribe

मोदींनी आता भारत माता की जय न म्हणता अनिल अंबानी की जय म्हणावं अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी फतवा जरी काढला तरी आम्ही भारत माता की जय म्हणणार असं मोदी यांनी म्हटलं आहे.

मोदींनी आता भारत माता की जय न म्हणता अनिल अंबानी की जय म्हणावं अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी फतवा जरी काढला तरी आम्ही भारत माता की जय म्हणणार असं मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना, काँग्रेसचे नामदार राहुल गांधी यांनी मोदी भारत माता की जय बोलू शकत नाही असं म्हटलं. पण, मी मात्र भारत माता की जय बोलणारच. काँग्रेसनं बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलं. पण भाजपनं मात्र अशा गुन्हेगारांना पक्षामध्ये थाराच दिला नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे काँग्रेस – भाजप आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

वाचा – मोदींनी ‘अनिल अंबानी की जय’ म्हणावं – राहुल गांधी

राजस्थानमधील प्रचारामध्ये राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी रोजगार निर्माण करण्यामध्ये अयशस्वी ठरल्याची टिका केली. तसेच त्यांनी आता भारत माता कि जय बोलू नये. त्यांनी अनिल अंबानी की जय, नीरव मोदी की जय, ललित मोदी की जय अशा घोषणा द्याव्यात अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. शिवाय, राफेल करारावरून देखील राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले आहे. या साऱ्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेमध्ये उत्तर दिलं आहे. ७ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये निवडणुका पार पडत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -