घरमहाराष्ट्रअंनिसवर बंदी आणा - संजीव पुनाळेकर

अंनिसवर बंदी आणा – संजीव पुनाळेकर

Subscribe

“अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर बंदी आणावी. अंनिस ही समिती हिंदू धर्माच्या विरोधात काम करत असून हिंदू धर्मावर आघात करत आहे. हिंदू धर्मियांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. त्यामुळे अंनिसवर कायद्यानुसार कायमस्वरूपी बंदी घालावी”, असा ठराव आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा निमित्त साधून राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदू जनजागृती समिती आयोजित भव्य राज्यव्यापी १४ वे वारकरी महाधिवेशनात करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी हात वर करून मान्यता दर्शवली, अशी माहिती राष्ट्रीय सचिव हिंदू विधिज्ञ संजीव पुनाळेकर यांनी दिली आहे. ते कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

आम्ही भारत माता की जय म्हणणारच – मोदी

मंगळवारी आळंदीमध्ये संजीवनी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी सेना आणि हिंदू जनजागृती समिती आयोजित भव्य राज्यव्यापी १४ वे वारकरी महाधिवेशन पार पडले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. संजीव पुनाळेकर म्हणाले की, धर्मांतर बंदीसाठी कायदा शासनाने त्वरित केला पाहिजे. हिंदू देवतांची नाटक, पुस्तके, चित्रपट आणि व्याख्यानामधून विटंबना थांबली पाहिजे. सनातन संस्थेवर बंदी घालू नये. वारकऱ्यांना छळणारा अट्रोसिटी कायद्या रद्द करावा. पुढे ते म्हणाले की, धर्मावर आघात होत आहे आणि हिंदू विभागाला जात आहे. यासबंधिचे सर्व ठराव वारकरी अधिवेशनात संमत करण्यात आला आहे.

- Advertisement -
कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेनेची पंढरपूरात सभा

या वारकरी महाधिवेशनला संभाजी भिडे येणार होते ही वस्तुस्थिती आहे. मात्र त्यांच्याकडून निरोप आला की, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून येत नसल्याचा निरोप दिला असल्याचे पुनाळेकर म्हणाले. ज्या ठिकाणी अधिवेशन झाले तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. जेणेकरून काही अनुचित प्रकार घडू नये. तसेच भारिपचे शेकडो कार्यकर्ते भिडे यांना विरोध करण्यासाठी आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -