घरताज्या घडामोडीअजानचा आवाज आल्यानंतर अमित शाहांनी थांबवलं भाषण, आता बोलू का?

अजानचा आवाज आल्यानंतर अमित शाहांनी थांबवलं भाषण, आता बोलू का?

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज बारामुल्ला येथे भाषण केलं. परंतु या जाहीर सभेत बोलताना अचानक सुरू झालेल्या अजानसाठी भाषण मध्येच थांबवलं आणि अजान संपल्यानंतर अमित शाहांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली.

अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे जाहीर सभेला संबोधित केलं. दरम्यान जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आल्याने अमित शाह यांनी आपले भाषण मध्यंतरी थांबवले आणि अजान संपल्यानंतर शाहांनी पुन्हा भाषणाला सुरूवात केली.

- Advertisement -

काय म्हणाले अमित शाह?

अमित शाह म्हणाले की, मला नुकताच संदेश मिळाला की, जवळच्या मशिदीत प्रार्थनेची वेळ झाली आहे, आता संपली आहे मग आता बोलू का? अशी जनतेची परवानगी घेऊन त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

- Advertisement -

1947 ते 2014 पर्यंत केवळ चार वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली आणि 2014 ते 2022 पर्यंत 9 महाविद्यालये सुरू झाली. तीन घराण्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला, असं म्हणत त्यांनी अब्दुल्ला, मुफ्ती आणि गांधी कुटुंब या तीन कुटुंबांवर जोरदार निशाणा साधला.


हेही वाचा : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यानंतर समर्थकांचा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -