घरदेश-विदेशजम्मू काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगची घटना; उत्तरप्रदेशातील दोन मजुरांची हत्या

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंगची घटना; उत्तरप्रदेशातील दोन मजुरांची हत्या

Subscribe

दिवाळीपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किलिंगच्या घटनांमुळे हादरले आहे. शनिवारी केंद्रशासित प्रदेशातील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, या घटनेला दोन दिवस होत नाही तोवर याच जिल्ह्यात दोन मजुरांची हत्या करण्यात आली. या घटनेतील दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील रहिवासी होते. मनोज कुमार आणि राम सागर अशी मजुरांची नावे आहेत. दहशतवाद्यांनी शोपिया येथील हरमन परिसरात हा हल्ला केला आहे.

या घटनेबाबत काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार म्हणाले की, लष्कर-ए-तोयब्बाचा इमरान बशीर गनी याने शोपियानमधील हरमन येथे मजुरांवर ग्रेनेड हल्ला केला होता. या दहशतवाद्याला शोपियान पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. काश्मीर झोनच्या पोलिसांनी मंगळवारी पहाटे ट्विट करून या घटनेची माहिती दिली. अपघातानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

लष्कराच्या दहशवताद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यावेळी हे दोन्ही मजूर एका टीन शेडमध्ये झोपले होते, यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. याआधी गेल्या आठवड्यात शनिवारी (15 ऑक्टोबर) पूरण कृष्ण भट नावाच्या काश्मिरी पंडिताची दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील चौधरी गुंड येथील घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे, ते बऱ्याच काळापासून शोपियानमध्ये राहत होते, ते कधीही दरी सोडून गेले नव्हते.

- Advertisement -

दरम्यान काश्मिरी पंडित शेतकरी पूरण कृष्ण भट यांची दहशवतवाद्यांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी श्रीनगरमधील हुर्रियत कॉन्फरन्सच्या कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांसह लोकांच्या एका गटाने धरणे आंदोलन केले. राजबाग येथील मीरवाइज उमर फारुक यांच्या नेतृत्वाखालील हुर्रियतच्या कार्यालयाबाहेर निदर्शक जमले आणि त्यांनी निषेध केला. काश्मीर खोऱ्यातील रक्तपातासाठी त्यांनी हुर्रियतला जबाबदार धरले. आंदोलकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, नगरपरिषद आणि काश्मिरी पंडितांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


प्रवाशांनो लक्ष द्या! मुंबई विमानतळ आज सहा तास राहणार बंद


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -