घरदेश-विदेशकेवळ सीमेअंतर्गत उपाययोजना नव्हे, आंतरराष्ट्रीय रणनीतीची गरज; इंटरपोलच्या महासभेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

केवळ सीमेअंतर्गत उपाययोजना नव्हे, आंतरराष्ट्रीय रणनीतीची गरज; इंटरपोलच्या महासभेत पंतप्रधानांचे प्रतिपादन

Subscribe

नवी दिल्ली : दहशतवादाचा मुकाबला आता केवळ भौतिक स्वरुपात राहिलेला नाही, तर ऑनलाइन कट्टरतावाद आणि सायबर धोक्यांद्वारे तो वेगाने पसरत आहे. एका बटणावर क्लिक करून हल्ला केला जाऊ शकतो किंवा यंत्रणांना गुडघे टेकायला लावू शकतो. प्रत्येक देश याविरुद्ध रणनीती आखत आहे. पण आपण आपल्या सीमेअंतर्गत जे करतो ते आता पुरेसे नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय रणनीती आणखी विकसित करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

- Advertisement -

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे मंगळवारी आयोजित इंटरपोलच्या 90व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. 2023 मध्ये इंटरपोल आपल्या स्थापनेची 100 वर्षे साजरी करणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.ही एक सिंहावलोकनाची वेळ आहे तसेच भविष्य ठरवण्याची वेळ आहे, असे त्यांनी सांगितले.

दहशतवाद, भ्रष्टाचार, अंमली पदार्थांची तस्करी, प्राण्यांची शिकार आणि संघटित गुन्हेगारी यासारख्या अनेक घातक जागतिक धोक्यांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. या धोक्यांच्या बदलाचा वेग पूर्वीपेक्षा अधिक आहे. जेव्हा धोके जागतिक असतात, तेव्हा प्रतिसाद केवळ स्थानिक असू शकत नाही! या धोक्यांवर मात करण्यासाठी जगाने एकत्र येण्याची वेळ आली आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले. आपल्याजवळ नाही ते मिळवण्यासाठी, आपल्याकडे जे आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी, आपण जे संरक्षित केले आहे, ते वाढवण्यासाठी आणि सर्वात योग्य व्यक्तींना ते वितरीत करण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

पंतप्रधानांनी यावेळी भ्रष्टाचाराचे धोके विशद केले. भ्रष्टाचार आणि आर्थिक गुन्ह्यांमुळे अनेक देशांतील नागरिकांच्या कल्याणाला हानी पोहोचली आहे. गुन्ह्यांचा आर्थिक स्रोत रोखण्याचे पर्याय शोधावे लागतील. हा पैसा ज्या देशातून उभा केला जातो, तो त्या देशातील नागरिकांचा असतो. बर्‍याचदा, हा पैसा जगातील सर्वात गरीब लोकांकडूनच घेतला जातो, असे त्यांनी नमूद केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासेर अल रईस, इंटरपोलचे सरचिटणीस जुर्गन स्टॉक आणि सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल उपस्थित होते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -