घरमनोरंजन'दृश्यम 2' प्रदर्शित होण्यापूर्वीच टीव्हीवर प्रदर्शित होणार तेलुगूमधील आँखेचा हिंदी वर्जन

‘दृश्यम 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच टीव्हीवर प्रदर्शित होणार तेलुगूमधील आँखेचा हिंदी वर्जन

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘दृश्यम 2’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, आता अनेकांचे लक्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागले आहे. हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु आता अशातच अजय देवगणला मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘दृश्यम 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाचा तेलुगू वर्जनचा हिंदी डब वर्जन टीव्हीवर आधीच प्रदर्शित करण्यात येणार आहे. ज्यामुळे आता या ‘दृश्यम 2’ च्या निर्मात्यांना याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

हिंदीमध्ये 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार ‘दृश्यम 2’

- Advertisement -

खरंतर, ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट ‘दृश्यम 2’ला फक्त हिंदीच नाही तर तेलुगू भाषेमध्ये देखील तयार करण्यात आले आहे. मल्याळम चित्रपटासोबतच तेलुगू वर्जन देखील सुपरहिट ठरला होता. आता हा चित्रपट अजय देवगण हिंदीमध्ये घेऊन येणार आहे. परंतु अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच गोल्डमाइन्स टिव्हीने हिंदीमध्ये डब केलेला चित्रपट 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, काही वेळानंतर त्यांनी ही माहिती डिलीट केली.

- Advertisement -

गोल्डमाइन्सने मागे घेतला निर्णय
गोल्डमाइन्स टिव्हीने हिंदीमध्ये डब केलेला चित्रपट 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले होते. परंतु काही वेळानंतर त्यांनी ती पोस्ट लगेच डिलीट केली.

‘दृश्यम’ ने जिंकलं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. दरम्यान, येत्या 17 ऑक्टोबर रोजी ‘दृश्यम 2’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

कंगना रनौत साकारणार नवी भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -