घरमुंबई...तरच मुंबईत कचऱ्याची विल्हेवाट लागेल!

…तरच मुंबईत कचऱ्याची विल्हेवाट लागेल!

Subscribe

मुंबईतील कचऱ्याचा विल्हेवाट लागावा यासाठी पालिकेने अनेक स्वच्छतेच्या मोहिमा राबवल्या आहेत. पालिकेने अनेकवेळा स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यासंबंधित संदेश देऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

सध्या मुंबईमधील डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली आहे. शिवाय यावर दुसरा कुठला पर्यायही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडवर सर्वाधिक कचरा टाकला जातो. या कचऱ्याचा विल्हेवाट लागावा यासाठी पालिकेने अनेक स्वच्छतेच्या मोहिम राबवल्या आहेत. पालिकेने अनेकवेळा स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यासंबंधित संदेश देऊन स्वच्छता राखण्याचे आवाहन मुंबईकरांना दिले आहे. त्यानुसार ओला कचरा आणि सुखा कचरा वेगळा करुन ओला कचऱ्याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारात करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. परंतु, पालिकेच्या या आदेशांचे पालन अजूनही ५६ टक्के गृहनिर्माण सोसायटींकडून केले जात नाही, असे उघड झाले आहे. मुंबईमध्ये एकूण ३३७४ मोठ्या सोसायटी आहेत. परंतु, यातील १८९८ सोसायट्यांनी पालिकेच्या आदेशांचे पालन केलेले नाही.

सोसायट्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल

कचरा विल्हेवाटावर पालिकेने गेले ११ महिन्यांत ८६२ सोसायट्यांवर खटला दाखल केला आहे. यापैकी ४०६ खटले निकाली लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर नोव्हेंबर २०१८ पर्यंत अशा सोसाट्यांडून पालिकेने तब्बल २७ लाख रुपये दंड वसूल केले आहे. दंड, फौजदारी गुन्हा दाखल करुनही ५६ टक्के सोसायट्यांचे मतपरिवर्तन करण्यात पालिकेला यश आलेले नाही. त्यामुळे पालिकेने पुन्हा स्वच्छतेचे महत्त्व सांगणाऱ्या मोहिमा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता महापालिका मोठ्या सोसायट्यांशी चर्चा करुन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यास कोणत्या अडचणी येत आहेत, हे जाणून घेऊन पालिका यावर तोडगा काढणार आहे. २०१७ मध्ये मुंबईत दररोज ८५०० मेट्रिक टन कचरा जमा व्हायचा. आता २०१८ मध्ये हे प्रमाण ७२०० मेट्रिक टनपर्यंत पोहोचले आहे. दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण पाच हजार टनवर आणण्याचा मानस पालिकेचा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईतील कचरा नक्की कोणत्या करवले गावात डम्प होणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -