घरदेश-विदेश'जिहाद' फक्त 'कुराण'मध्ये नाही तर 'गीते'तही, काँग्रेस नेत्याच्या विधानामुळे वादाला फुटले तोंड

‘जिहाद’ फक्त ‘कुराण’मध्ये नाही तर ‘गीते’तही, काँग्रेस नेत्याच्या विधानामुळे वादाला फुटले तोंड

Subscribe

नवी दिल्ली : जिहाद (Jihad) ही संकल्पना केवळ कुराणात नाही तर भगवद्गीता (Geeta) आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. अस विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शिवराज पाटील यांनी केलं आहे. (Former Home Minister Shivraj Patil) दिल्लीत काँग्रेस नेत्या मोहसिना किडवई यांच्या चरित्र्यावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. मात्र पाटील यांच्या विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या विधानावर आता भाजपनेही सडकून टीका केली आहे.

यावेळी माजी मंत्री शिवराज पाटील म्हणाले की, इस्लाम धर्मातील जिहाद या संकल्पनेवर अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर सत्तेचा वापर केला पाहिजे, अशी ही संकल्पना आहे. गीतेचा जो काही विशिष्ट भाग महाभारतात सांगण्यात आला आहे, त्यामध्येच जिहाद आहे. महाभारतात श्रीकृष्णांनी अर्जुनालाही जिहादचा धडा शिकवला होता. त्यामुळे कुराणमध्येच नाही तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही जिहादचा उल्लेख आहे. माजी मंत्री शिवराज पाटील यांच्या विधानावरून आता काँग्रेसने त्यांना लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

काँग्रेसने भगवा दहशतवाद संकल्पनेला जन्म दिला, राममंदिराला विरोधा केला, प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावर संशय घेतला, हिंदूत्वाची तुलना आयसिसशी केली अशा शब्दात भाजप नेते शहेजाद पुनावाला यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पुनावाला यांनी याबाबत ट्विट केले आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये शिवराज पाटील यांचे नाव घेतले जाते. महाराष्ट्रातील लातूरचे ते खासदार आहेत. ते अनेकदा केंद्रात मंत्री देखील राहिले. दरम्यान 2010 मध्ये शिवराज पाटील यांची पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


गुगलला 1,337 कोटींचा दंड, कॉम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाची कारवाई

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -