घरताज्या घडामोडीअफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात स्फोट; 2 मुलांचा जागीच मृत्यू

अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात स्फोट; 2 मुलांचा जागीच मृत्यू

Subscribe

अफगाणिस्तानमधील पक्तिका या पूर्वेकडील प्रांतात स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोर्टार शेलच्या स्फोटामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला.

अफगाणिस्तानमधील पक्तिका या पूर्वेकडील प्रांतात स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मोर्टार शेलच्या स्फोटामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 2 मुलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. (middle east explosion in Afghanistan eastern province of paktika)

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट दहशतवादी हल्ला नव्हता. याठिकाणी एका गेममध्ये मुलांनी थेट मोर्टार पेटवला, ज्यामुळे हा स्फोट झाला. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये विक्रमी 51 टक्के वाढ झाली आहे. एका स्थानिक थिंक टँकच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पाक इन्स्टिट्यूट ऑफ पीस स्टडीज (PIPS) च्या मते, अफगाणिस्तानमध्ये दोन दशकांच्या रक्तरंजित संघर्षानंतर, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात अमेरिका अपयशी ठरल्यावर अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर इस्लामिक बंडखोरांनी राजधानी काबूलवर हल्ला केला आणि प्रतिकार न करता शहर ताब्यात घेतले. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून पाकिस्तानमध्ये झालेल्या एकूण 250 हल्ल्यांमध्ये 433 लोक मारले गेले आणि 719 जखमी झाले.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणी एकामागून एक बॉम्ब स्फोट होत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या पश्चिम काबूलमधील शाहीद माजरी रोडवरील एका शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट झाला होता. या हल्ल्यात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 46 विद्यार्थीनी आणि महिलांचाही समावेश आहे. या स्फोटानंतर परिसरात एकच घबराट पसरली.


हेही वाचा – बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी आजही संपावर, विविध आगारात कामबंद आंदोलन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -