घरमुंबईगोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

गोरेगाव आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

Subscribe

मुंबईतील गोरेगाव परिसरात आरे कॉलनीत बिबट्याच्या हल्ल्यात एका दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात या घटनेमुळे कुटुंब आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. इतिका लोट असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 15 मध्ये ही घटना घडली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 6.30 च्या सुमारास दीड वर्षाची मुलगी आईसह दिवाळीचे दिवे लावण्यासाठी घराबाहेर आली होती. दिवे लावून घरी जाताना मागून बिबट्याने दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला केला, हल्ल्या झाला त्यावेळी मुलीची आई घरात होती. घराबाहेर असणारी इतिका मागून घरात न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. यावेळी इतिकाचा मृतदेह जंगलात आढळला, बिबट्याच्या हल्ल्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत पुढील तपास केला आहे.

- Advertisement -

सकाळच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यतेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरे कॉलनीमध्ये बिबट्याचा अधिवास आहे. याआधीही आरे कॉलनीमध्ये बिबट्य़ाने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. मात्र दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने बिवट्याचा अधिवास आणि मानवी वस्ती या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


शेतकऱ्यांनी त्यांच्यावर पहिला आसूड ओढला पाहिजे; दानवेंची ठाकरेंवर जहरी टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -