घरक्रीडाIND vs NED : रोहित, विराट, सूर्याची धमाकेदार फिफ्टी; नेदरलँडसमोर 180 धावांचे आव्हान

IND vs NED : रोहित, विराट, सूर्याची धमाकेदार फिफ्टी; नेदरलँडसमोर 180 धावांचे आव्हान

Subscribe

टी-20 विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना आज नेदरलँडसोबत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 180 धावांचे आव्हान नेदरलँडसमोर ठेवले. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना सुरू असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली.

टी-20 विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना आज नेदरलँडसोबत सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 180 धावांचे आव्हान नेदरलँडसमोर ठेवले. ऑस्ट्रेलियातील सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना सुरू असून, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. (india vs netherlands t20 world cup 2022 india 180 runs target to netherlands)

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला चांगली सुरूवात करून दिली. तसेच, नेदरलँडसमोर 180 धावांचे आव्हान ठेवले.

- Advertisement -

या सामन्यात विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने 179 धावा केल्या. पाकिस्तानवर विजयानंतर भारतीय संघाला ग्रुप 2 मध्ये आघाडी घेण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, असे असताना आजही भारताचा सलामीवीर के. एल. राहुल स्वस्तात बाद झाला. राहुलला केवळ 9 धावाच करता आल्या.

त्याशिवाय इतर तीनही फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. यामध्ये कर्णधार रोहितने 39 चेंडूत 53 धावा केल्या. तर विराटने 44 चेंडूत नाबाद 62 आणि सूर्यकुमारने 25 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. दोघांनी नाबाद 95 धावांची भागिदारीही उभारली. यावेळी नेदरलँडकडून फ्रेड आणि वॅन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

- Advertisement -

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.

नेदरलँड संघ :

स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन.


हेही वाचा – बीसीसीआयची मोठी घोषणा, पुरुष- महिला क्रिकेटर्सला मिळणार समान मानधन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -