घरताज्या घडामोडीअखेर सापडली! कोल्हापुरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा कर्नाटकात लागला पत्ता

अखेर सापडली! कोल्हापुरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा कर्नाटकात लागला पत्ता

Subscribe

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून 13 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जात होता. शिवाय, यामागे लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याप्रकरणी आता पोलिसांना त्या मुलीला शोधण्यात यश आले आहे.

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून 13 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जात होता. शिवाय, यामागे लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याप्रकरणी आता पोलिसांना त्या मुलीला शोधण्यात यश आले आहे. बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम तरुणासह कर्नाटक राज्यातील संकेश्वरमध्ये सापडली आहे. या दोघांनाही संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता दोघांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस कर्नाटककडे रवाना झाले आहेत. (kolhapur minor girl found with boy in karnataka love jihad)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी बेपत्ता असल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांनी कोल्हापुर पोलिसांनी ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारानुसार कोल्हापुर पोलिसांनी त्या मुलीच्या शोधासाठी अपहरण करणाऱ्या संशयीताचा फोटो आणि त्या मुलीचा फोटो प्रसिद्ध केला होता. अल्ताफ काझी (22) असे त्या अपहरकर्त्याचे नाव आहे. तसेच, अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -

13 वर्षीय शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले होते. मुलीच्या अचानक बेपत्ता प्रकरणाला कोल्हापुरात लव्ह जिहादचे वळण लागले. मुलीच्या अपहरणाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आमदार नितेश राणे यांनीही सहभागी घेतला होता. तसेच, त्यांनी पोलिसांना खडे बोल सुनावत, समस्त हिंदू बांधवांना जागे होण्याचे आव्हान केले होते. यावेळी त्यांनी राज्यात लव्ह जिहादची प्रकरणे खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुलगा बेपत्ता होऊन जवळपास 17 दिवस उलटून गेले तरी, तिचा पत्ता लागत नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना धारेवर धरले. शिवाय, कालच्या कोल्हापुरातील आंदोलनात सहभागी झालेले भाजपा आमदार नितेश राणे यांनीही पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. तसेच, पोलिसांवर कारवाईची मागणी केली. त्याचप्रमाणे मुलीचा शोध घेऊन परत न आणल्यास तांडव करू असाही इशारा दिला होता.

- Advertisement -

या घटनेतील महत्वाचे मुद्दे

  • कोल्हापुरातली ही मुलगी 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता होती.
  • बेपत्ता मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत होती.
  • दिवाळीपूर्वी शाळेचा शेवटचा पेपर द्यायला गेलेली मुलगी परत घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली.
  • 17 दिवस उलटूनही मुलीचा अद्याप शोध लागला नाही.
  • मुस्लिम युवकाने या मुलीला पळवल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
  • मुस्लिम युवकही बेपत्ता असल्याने हा संशय बळावला आहे.
  • लव्ह जिहादसाठीच मुलीला पळवल्याचा आरोप होत आहे.
  • मुलीचा आणि युवकाचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – कोल्हापुरात ‘लव्ह जिहाद’चा संशय, भाजपाच्या नितेश राणेंचे ठिय्या आंदोलन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -