घरमहाराष्ट्रटिकलीबद्दल केलेल्या वक्तव्याचा खुलासा द्या; महिला आयोगाचा संभाजी भिडेंना आदेश

टिकलीबद्दल केलेल्या वक्तव्याचा खुलासा द्या; महिला आयोगाचा संभाजी भिडेंना आदेश

Subscribe

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भांत त्वरित खुलासा करावा असे सांगिले आहे.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटेनेचे नेते संभाजी भिडे (sambhaji bhide) हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशातच संभाजी भिडे त्यांनी यांनी यावेळी थेट महिला पत्रकाराविषयी वक्तव्य केले आहे आणि त्यामुळेच ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काल 2 नोव्हेंबर रोजी संभाजी भिडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची भेट घेतली. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे या संभाजी भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना थांबविले असता संभाजी भिडेंनी वादग्रस्त विधान करत तिथून काढता पाय घेतला.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संभाजी भिडेंची प्रतिक्रया घेण्यासाठी थांबलेल्या महिला पत्रकाराला भिडे म्हणाले, ‘आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो’ असं वक्तव्य करत संभाजी भिडे यांनी महिला पत्रकराचा अपमान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

संभाजी भिडेंना हे वक्तव्य आता चांगलेच भोवणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भांत त्वरित खुलासा करावा असे सांगिले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणूनत्यांनी विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला धरून नाही असे महिला आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान संभाजी भिडे यांच्या वक्तव्यासंदर्भात सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच महिला आयोगानेसुद्धा तातडीने याची दखल घेतली आहे. आपल्या वक्तव्याचा खुलासा हाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना पाठविण्यात आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनीसुद्धा संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे. याआधी ही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांची मनोवृत्ती यातून दिसते. त्यांना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा त्वरितखुलासा करावा, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.


हे ही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, भाजपाच्या माघारीनंतर ७ उमेदवार रिंगणात

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -