घरक्रीडापाकिस्ताननंतर बांगलादेशविरुद्धचा सामनाही विराट कोहलीसाठी ठरला वादग्रस्त

पाकिस्ताननंतर बांगलादेशविरुद्धचा सामनाही विराट कोहलीसाठी ठरला वादग्रस्त

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची रन-मशीन पुन्हा सुरू झाली आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली चांगलाच फॉर्म असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या 4 सामन्यात विराटने 220च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची रन-मशीन पुन्हा सुरू झाली आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात विराट कोहली चांगलाच फॉर्म असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या 4 सामन्यात विराटने 220च्या सरासरीने धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे 4 सामन्यात त्याने 3 अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे हे विश्वचषक विराटसाठी सुर गवासणारे ठरल्याचे दिसत आहे. मात्र, दुसरीकडे हेच विश्वचषक विराटसाठी वादग्रस्तही ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश संघाबरोबर झालेल्या सामन्यात विराटची बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या वादाचा किंवा बाचाबाचीचा त्याच्या खेळीवर परिणाम झाल्याचे कुठेही दिसत नाही.

टी-20 विश्वचशषकातील भारताचा चौथा सामना बांगलागदेशविरुद्ध झाला. त्यावेळी विराटचा पहिली बाचाबाची भारतीय संघाच्या फलंदाजीवेळी झाली. विराट कोहली 16 व्या षटकात फलंदाजी करत होता. तेव्हा हसन महमूद गोलंदाजीवर होता. गोलंदाजीवेळी हसन महमूदने बाउन्सर चेंडू टाकला. त्यावर कोहलीने धावा काढली आणि पंचांकडे पाहत नो-बॉलची मागणी केली. विराटच्या इशाऱ्यानंतर पंचांनी नो-बॉल दिला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन संतापला आणि तो पंचाच्या दिशेने धावला. त्यानंतर विराट कोहली त्याच्यामध्ये गेला आणि त्याने त्याला पकडले. अखेर शाकिबचा राग नियंत्रणात आला आणि दोघेही पुन्हा हसताना दिसले.

- Advertisement -

या सामन्यात विराट कोहली याने 44 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावांची खेळी केली. विराट कोहलीचे हे टी-20 विश्वचषकातील तिसरे अर्धशतक होते.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात विराट कोहली याने ‘फेक फील्डिंग’ केल्याचे बांगलादेशच्या नुरुल हसनने सांगितले. तसेच, पंचांनी विराट कोहलीच्या ‘फेक फील्डिंग’कडे दुर्लक्ष केल्याचे त्याने सांगितले. बांगलादेशच्या डावाच्या 7व्या षटकात कोहलीने आपण अर्शदीप सिंगचा थ्रो पकडत नॉन स्ट्रायकरच्या टोकाला फेकत असल्याचे भासवले. मात्र, याकडे पंचांनी दुर्लक्ष केले. तसेच, त्याच्यावर दंड ठोठावले असते तर सामना आमच्या बाजूने गेला असता, पण दुर्दैवाने तसे झाले नाही, असेही त्याने सांगितले. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नुरुल हसन बोलत होता.

- Advertisement -

आयसीसीचा नियम काय सांगतो?

ICC च्या अनफेअर प्ले वरील 41.5 च्या कायद्यानुसार, जाणूनबुजून फलंदाजाचे लक्ष विचलित केले, फसवले किंवा अडथळा आणला तर त्याला डेड बॉल घोषित केले जाऊ शकते. तसेच, फलंदाजी करणाऱ्या संघाला अतिरिक्त पाच धावा दिल्या जातात.


हेही वाचा – विराट कोहलीची T20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावसंख्या; 220 च्या सरासरीने केल्या रन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -