घरताज्या घडामोडी'भारत जोडो' यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी - जयंत पाटील

‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी – जयंत पाटील

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राति दाखल झाली असून नांदेडमध्ये या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. कन्याकुमारी येथून निघालेली ही यात्रा ६० दिवसांचा प्रवास करून ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. कापशी फाटा ते नांदेड पदयात्रेला आज सकाळी तुफान प्रतिसाद मिळला. देशा – परदेशातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य जनता यात्रेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाली होती. दरम्यान, ‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

- Advertisement -

‘भारत जोडो’ यात्रा ही देशाला खऱ्या अर्थाने एकत्र जोडणारी, लोकशाहीला बुलंद करणाऱ्या लोकांच्या मनातील एक भावना आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपली संविधानिक मूल्ये, लोकशाहीची तत्वे यांना प्रथम प्राधान्य देतात, असं म्हणत जयंत पाटलांनी ट्वीट केलं आहे.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही सहभाग घेतला. खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी येथील लोकांना संबोधित करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदींनी शेतकऱ्यांना कर भरायला लावला. आपल्या देशात अनेक तपस्वी होऊन गेले. कष्टकऱ्यांना हाल सोसावे लागतात. काही वर्षांपूर्वी मोदींनी नोटबंदी केली, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. तसेच या देशाची शक्ती माझ्या पाठिशी आहे, असं राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा : ठाण्यात अस्वच्छतेबद्दल दोन जणांवर दंडात्मक कारवाई


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -