घरमहाराष्ट्रसिंधुदुर्गमध्ये आढळला पायाला विशिष्ट "कोड"रिंग असलेला विदेशी पक्षी

सिंधुदुर्गमध्ये आढळला पायाला विशिष्ट “कोड”रिंग असलेला विदेशी पक्षी

Subscribe

मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बाभुळकर यांच्या घराजवळ हा पक्षी येऊन बसला होता, त्यांनी या पक्षाला ताब्यात घेऊन वनविभागाकडे सोपवले होते

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे येथे पायात विशिष्ट कोडमध्ये संदेश असलेली रिंग असलेला पक्षी
आढळल्याने खळबळ उडाली होती. विशेषतः हा पक्षी कोणत्या जातीचा आहे? कुठल्या कारणासाठी सोडला आहे, याबाबत माहिती उपलब्ध होत नसल्याने आणि ‘अबुधाबी’ असे लिहिलेले असल्याने, तसेच उर्वरित विशिष्ट संदेश डी कोडिंग करता येत नसल्याने गूढ वाढले होते.

मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बाभुळकर यांच्या घराजवळ हा पक्षी येऊन बसला होता, त्यांनी या पक्षाला ताब्यात घेऊन वनविभागाकडे सोपवले होते. देवगडमधील मानद जीव संरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांच्या सल्ल्यानुसार बॉम्बे नॅचरल हिस्ट्री ऑफ सोसायटी या संस्थेशी संपर्क केला असता प्रजनन कालावधीतील प्रवास समजण्यासाठी त्याच्या पायात “ती” रिंग असल्याचे समोर आले.

- Advertisement -

हा पक्षी “हाऊचरा माळढोक” या जातीचा असून, प्रजनन कालावधीतील प्रवास समजण्यासाठी त्याच्या पायात रिंग अडकवून त्याला सोडण्यात आले, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी दिली आहे.
सदर पक्षी अबुधाबीतून राजस्थानमार्गे पाकिस्तानला जात असताना वाटेत तो मुणगे येथे थांबला असावा, याबाबत राजस्थान राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून या पक्षाला पुढील प्रवासासाठी सोडायचे का, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.

मुणगे येथील माजी पंचायत समिती सदस्य संजीवनी बांबुळकर यांच्या घराजवळच्या बागेत गुरुवारी रात्री आठच्या सुमारास एक विदेशी पक्षी आढळून आला असून, या पक्ष्यावर असलेल्या बिल्ल्यावरून तो अबुधाबी येथून सोडण्यात आल्याचे वनविभागाकडून निदर्शनास आले आहे. हा पक्षी निदर्शनास येताच संजीवनी बांबूळकर यानी वनविभागाशी संपर्क साधून वनपाल सादिक फकीर, वनरक्षक निलेश साठे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि ताब्यात घेतले होते. मानद जीव रक्षक प्राध्यापक नागेश दप्तरदार यांनी यासंदर्भात बॉम्बे नॅचरल हिस्टरी ऑफ सोसायटीशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली असून, येत्या दोन दिवसांत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचाः मुंबई पोलीस दलातील 19 पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या

सिंधुदुर्गमध्ये आढळला पायाला विशिष्ट “कोड”रिंग असलेला विदेशी पक्षी
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -