घरभक्तीपहिला मार्गशीर्ष गुरुवार; जाणून घ्या महत्व

पहिला मार्गशीर्ष गुरुवार; जाणून घ्या महत्व

Subscribe

कार्तिक अमावस्या संपली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी घरोघरी देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते. असं म्हणतात, या महिन्यात देवी लक्ष्मीची पूजा आराधना केल्यानंतर कुटुंबात सुख-समृद्धी येते. यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशी पहिला मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे.

- Advertisement -

मार्गशीर्ष महिन्याचे काय आहे महत्व?मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मींसोबतच श्री विष्णूंची देखील पूजा-आराधना केल्यास आपल्या आयुष्यावर आणि कुटुंबावर सदैव लक्ष्मी-नारायणांचा आर्शिवाद प्राप्त होतो. हिंदू धर्मात या महिन्याला श्रावण महिन्या इतकेच पवित्र मानले जाते.

असे केले जाते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत

- Advertisement -

  • आंब्याच्या डहाळय़ा, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूपात स्थापना केली जाते.
  • या कलशाला सजवून आरास केली जाते. यानंतर स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य दाखवला जातो.
  • या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ या गोष्टी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी लागतात.
  • लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात. कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा महिलांकडून केली जाते.
  • दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते.

 


हेही वाचा :

कार्तिक पौर्णिमेच्या श्री विष्णूंसोबत करा देवी लक्ष्मीची देखील पूजा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -