घरमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंनी केले शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या...

सुप्रिया सुळेंनी केले शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…

Subscribe

प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे ट्विट करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कौतुक केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करत राज्यात नवे सरकार स्थापन केले. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात सुद्धा मोठया प्रमाणावर उलथापालथ झाली अशातच शिंदे गटातील आमदार हे सातत्याने राष्ट्रवादीवर टीकाही करत होते. राष्ट्रवादीचे नेते शिवसेना संपवायला निघाले आहेत असा आरोप सुद्धा शिंदे गटाकडून राष्ट्रवादीवर करण्यात येत होता. अशातच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वरूनच मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला होता. सुप्रिया सुळे यांच्या समर्थकांनी शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. पण हे सगळे सुरु असतानाच आता मात्र या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क शिंदे गटातील आमदारांचे कौतुक केले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होत त्यामुळे राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्यावर मोठया प्रमाणात टीका सुद्धा होते आहे. अशासतच शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा कठोर शब्दांत समाचार घेतला. शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असेल तर चांगले नाही. अशाने पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचा परिणाम दोघांनाही भोगावा लागेल. असा थेट इशारा संजय गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केले त्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे ट्विट करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कौतुक केले आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्राणावर चर्चा सुरु आहे.


हे ही वाचा – खडसेंच्या मुलाची आत्महत्या की हत्या?, गिरीश महाजनांचा सवाल

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -