घरमुंबईजीएसटीनंतर भारतातील जनता टॅक्स भरण्यासंदर्भात अधिक जागरूक झाली - देवेंद्र फडणवीस

जीएसटीनंतर भारतातील जनता टॅक्स भरण्यासंदर्भात अधिक जागरूक झाली – देवेंद्र फडणवीस

Subscribe

राज्याच्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागातून सक्तीची वसुली न करता एक बिल त्यांच्या कडून घेऊन तूर्तास त्यांचे कनेक्शन तोडू नये असे देश दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईमध्ये आज जागतिक लेखाकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १०० वर्षांनंतर भारताला आणि मुंबई हा मान मिळाला. यामध्ये १०० हुन अधिक देशांचे अकाउंटंट इथे आले होते. त्यांच्याशी चर्चा करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

याच संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले, जीएसटी लागू केल्या नंतर भारतातील जनता ही टॅक्स भरण्यासंदर्भात अधिक प्रमाणावर जागरूक झाला आहे आणि यामध्ये चार्टन्ट अकाउंटंट जे आहेत त्यांची महत्वाची भूमिका आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

याच संदर्भांत फडणवीस पुढे म्हणाले; राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली त्याचा फटका पिकांना बसलेला, शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे आता पुढचे पिक घेण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच कृषिपंपा संबंधित जे बिल भरू शकतात त्यांनी ते भरले पाहिजे पण जे अडचणीत आहेत त्यांनी केवळ एका महिन्याचे बिल भरले तरी त्यांना सध्या बिल भारण्यामध्ये सूट देण्यात यावी, त्यांचे कनेक्शन कापण्यात येऊ नये. भविष्यात त्यांच्या कडून बिलाचे पैसे येतील. त्यामुळे राज्याच्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागातून सक्तीची वसुली न करता एक बिल त्यांच्या कडून घेऊन तूर्तास त्यांचे कनेक्शन तोडू नये असे देश दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सुद्धा आज एक महत्वाची बैठक झाली त्या संदर्भांत सुद्धा उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भांत सध्या केस सुरू आहे. तिची सद्यस्थिती काय आहे. सीमाभागातील नागरिकांना कशाप्रकारे सवलती दिल्या पाहिजेत अश्या अनेक गोष्टीवर चर्चा झाली. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नवीन वकिलांचे पॅनल सुद्धा तयार करण्यात येईल. त्याचबरोबर सीमाभागातील नागरिकांना विविध प्रकारची मदत कशी करता येईल हा सुद्धा आमचा प्रयत्न आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हे ही वाचा – आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांवर आमची निष्ठा, नितीन गडकरींनी व्हिडीओ केला शेअर

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -