घरदेश-विदेशश्रद्धा वालकरचे पत्र गंभीर, तिचा जीव वाचला असता; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

श्रद्धा वालकरचे पत्र गंभीर, तिचा जीव वाचला असता; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Subscribe

वसईतील लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याप्रकरणी आरोप आफताब पूनावाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे. दिल्ली कोर्टाने मंगळवारी त्याच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. यादरम्यान आफताबची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली, ज्यात त्याने अनके नवे खुलासे केले आहेत. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याचे कोर्टात कबूल केले. तपासादरम्यान त्याच्या घरातून एक बुक देखील सापडली आहे. ज्यात त्याने श्रद्धाच्या शरीराचे कोणता तुकडा कुठे टाकला हे लिहून ठेवले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

श्रद्धा आणि आफताब यांचे अनेक विषयांवरून सतत खटके उडायचे. 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धाने आफताबच्या त्रासाला कंटाळून पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आफताब गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र ही तक्रार 19 डिसेंबर 2020 रोजी श्रद्धाने मागे घेतली. आफताबच्या त्रासाबाबत श्रद्धाने एक पत्रही लिहिले होते. जे पत्र आता समोर येत आहे. मात्र त्यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर श्रद्धा वाचली असती, अशाप्रकारच्या चर्चा सुरु आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाने लिहिले पत्र वाचले असून ते पत्र अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, मी श्रद्धाने लिहिलेलं पत्र वाचलं, पत्र लिहूनही पोलिसांनी का कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही, मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता, असं फडणवीस म्हणाले.

आफताब श्रद्धाला त्रास देत असल्याचे त्याच्या कुटुंबियांनी ठाऊक होते, असंही श्रद्धाने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनही पोलिसांनी कारवाई का नाही केली? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


श्रद्धा वालकरचे पत्र गंभीर, तिचा जीव वाचला असता; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -