घरमनोरंजनएकवीरा आईच्या दर्शनाला अभिनेत्री मयुरी वाघ आणि अमृता पवार

एकवीरा आईच्या दर्शनाला अभिनेत्री मयुरी वाघ आणि अमृता पवार

Subscribe

अभिनेत्री अमृता पवार ही 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मिलिकेत प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

सोनी मराठी वाहिनीवर ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका येत्या २८ नोव्हेंबरपासून सोम-शनि प्रसारीत होणार आहे. त्यानिमित्त या मालिकेतील कलावंतांनी कार्ला, लोणावळा येथे स्थित एकवीरा मंदिरात जाऊन एकवीरा देवीचे दर्शन घेतले. यानंतर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेत एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर आणि सोनी मराठी फिक्शन हेड सोहा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या मालिकेचे शीर्षकगीत दिग्पाल लांजेकर यांनी लिहिले असून ते केवल वाळंज यानी गायले आहे. या प्रसंगी ते शीर्षक गीत केवलने उपस्थितांसमोर गायले.

- Advertisement -


हे ही वाचा –  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

विविध व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवार ही ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मिलिकेत प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त या मालिकेत निषाद भोईर, अभिनय सावंत, सविता मालपेकर, मिलिंद सफई, धनंजय वाबळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या मालिकेची निर्मिती दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि लेखक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांच्या मुळाक्षर प्रोडक्शनने केली आहे. विशेष म्हणजे चिन्मय मांडलेकर या मालिकेचे लेखन करीत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – प्रियंकाने दाखवली मुलगी मालतीची पहिली झलक; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -