घरमुंबईविनंती करूनही मराठी गाणी वाजविण्यास नकार; मनसे पदाधिकाऱ्यांकडून हॉटेल चालकाला चोप

विनंती करूनही मराठी गाणी वाजविण्यास नकार; मनसे पदाधिकाऱ्यांकडून हॉटेल चालकाला चोप

Subscribe

या हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

वाशी येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पार्टीचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे कर्मचारी विविध गाण्यावर पार्टीत एन्जॉय करत होते त्याच वेळी इव्हेन्ट ऑर्गनाईझर सोबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेल चालकांना मराठी गाणे लावण्याची विनंती केली. पण हॉटेल मालकाने मराठी गाणे लावण्यासाठी नकार दिला आणि म्हणूनच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला मनसे स्टाईलने चोप दिला आहे.

नवी मुंबईतील वाशी मधल्या एका हॉटेलमध्ये एका खाजगी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉटेलमध्ये हिंदी आणि इतर भाषेतील गाणी लावलेली होती. इव्हेन्ट ऑर्गनायझर आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणी वाजविण्याची विनंती हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे केली. पण या हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास बंदी आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. वारंवार विनंती करूनही मराठी गाणी वाजविण्यासाठी नकार दिला जात होता. दरम्यान ही बाब मनसेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी हॉटेल चालकालासुद्धा मराठी गाणी वाजविण्याची विनंती केली पण यावेळी देखील हॉटेल चालकाने मराठी गाणी लावण्यास नकार दिला त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चांगलाच चोप दिला.

- Advertisement -

दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या हॉटेल विरोधात नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर हॉटेल संचालकांनी गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला असे सांगत दिलगिरी व्यक्त केली.

- Advertisement -

हे ही वाचा –  राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -