घरमहाराष्ट्रदेशावर पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे; फडणवीसांचे आवाहन

देशावर पुन्हा दहशतवादी हल्ला होऊ नये म्हणून नागरिकांनी सतर्क राहावे; फडणवीसांचे आवाहन

Subscribe

पोलिस बॉईज संघटनेने दहशतवादी हल्यातील वीरांच्या आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिस बॉईज संघटनेने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.  यावर्षी गेट वेच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती राहून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. हा कार्यक्रमातून एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात आणि इटलीमध्येही शहीद जवानांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुंबई – २६/११ हा दहशतवादी हल्ला म्हणजे जगामध्ये भारताची मान खाली घालण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. आमच्या जाबाज अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन या दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडला. ज्या समाजामध्ये वीरांचा सन्मान केला जातो. तो समाज प्रगती करतो. या क्षणी आपण संकल्प करूया, देशावर अशाप्रकारचा दहशतवादी हल्ला होऊ देणार नाही. एक जागरुक नागरिक म्हणून कायम सतर्क राहू, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवाहन केले आणि शहिदांना यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisement -

मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन, पोलीस बॉईज चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गेटवे येथे पुष्पांजली कार्यक्रम आणि मशाल रॅलीचे आयोजित करण्यात आले होती.

हा कार्यक्रमातून एकाच वेळी संपुर्ण महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात आणि इटलीमध्येही शहीद जवानांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांनी कायदे व नियमांची अंमलबजावणी करून जीव व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेत त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार मानले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विधान परिषद अध्यक्ष राहुल नार्वेकर, एनएसजी कमांडो सुनील जोधा, मिलिंद भारंबे, ज. सी.पी.(गुन्हे), विवेक फणसाळकर, मुंबई पोलीस आयुक्त, विश्वास नांगरे पाटील, ज. सी.पी. (प्रशासक), संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी शूर शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

भारताच्या इतिहासातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यांपैकी या हल्ल्याची कहाणी अत्यंत थरारक आणि वेदनादायक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लिओपोल्ड कॅफे, ताजमहाल पॅलेस हॉटेल आणि ट्रायडंट हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण हल्ल्यात मुंबई स्तब्ध झाली आणि अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. याप्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील याठिकाणी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले म्हणाले की, 26/11 च्या हल्ल्यांमध्ये सुमारे 166 जणांना प्राण गमवावे लागले आणि सुमारे 300 जण जखमी झाले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने गेली ६ वर्षे आम्ही नियमितपणे २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि नागरीकांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली कार्यक्रम घेत आहोत. यावर्षी देखील महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मशाल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला असून उपस्थित नागरीकांनीही याठिकाणी उपस्थित राहून शहीद शुरवीरांना आदरांजली वाहिली.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -