घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती, केंद्रीय मंत्र्यांनी सुनावले

चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती, केंद्रीय मंत्र्यांनी सुनावले

Subscribe

मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत केंद्रीय मंत्र्यांनी सुनावले आहे.

शाळांना मिळणाऱ्या अनुदानाबाबत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. चिंचवड येथे काल चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई देखील फेकण्यात आली होती. चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले माहिती नाही, पण शाळा चालवण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या हिमतीवर शाळा सुरू कराव्यात असे त्यांना म्हणायचे असेल, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल त्यांची बाजू सावरून घेतली. पण आज त्यांनी ट्विटरवरून याबाबत नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

भीक या शब्दाचा केलेला वापर अत्यंत चुकीचा आहे. सामाजिक क्रांती करणाऱ्या महापुरुषांचा अवमान आहे. आम्हाला चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे चंद्रकांतदादांनी आपले शब्द मागे घ्यावेत आणि समाजाप्रती दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

- Advertisement -

तू मागू नकोस भीक… तू शिक, असाच संदेश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा होता. दलितमुक्तीचा लढा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारला. त्यांचे जीवन आणि समग्र कार्य हे स्वाभिमानावर आधारलेले आणि स्वाभिमानाची शिकवण देणारे आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -