घरमहाराष्ट्रमहापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना रट्टा दिला पाहिजे, बच्चू कडूंचा संताप

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना रट्टा दिला पाहिजे, बच्चू कडूंचा संताप

Subscribe

Bachhu Kadu | महाविकास आघाडीला महापुरुषांबद्दल प्रेम आहे हे चांगलं आहे. राज्यपाल, चंद्रकांत पाटील किंवा संजय राऊत कोणीही असं विधान करायला नको होतं. पण शब्द चुकणं आणि जाणुनबुजून बोलणं हा मोठा फरक आहे”.

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. तसंच, महाराष्ट्रातील इतर महापुरुषांबाबत बोलताना अनेकांची जीभ घसरली आहे. यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सर्वांचा समाचार घेतला. महापुरुषांचा अपमान करणारी विधानं होत असल्यास रट्टा दिला पाहिजे, असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीला महापुरुषांबद्दल प्रेम आहे हे चांगलं आहे. राज्यपाल, चंद्रकांत पाटील किंवा संजय राऊत कोणीही असं विधान करायला नको होतं. पण शब्द चुकणं आणि जाणुनबुजून बोलणं हा मोठा फरक आहे”.

- Advertisement -

“महापुरुषांबद्दल कोणी जाणुनबुजून अपमानजनक बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा किंवा कोणत्याही पदावर असला तरी त्याला रट्टा दिला पाहिजे. पण कोणीही महापुरुषांचं भांडवल करून कोणी राजकारण करु नये. कधीतरी आमच्याही तोंडातून चुकीचं वाक्य बाहेर पडतं. पण त्यानंतर लगेचच क्षमा मागत सामोरं गेलं पाहिजे. राज्यपालांनीही ते करण्यास हरकत नसावी,” असं बच्चू कडू म्हणाले.

महाविकास आघाडीचा महामोर्चा

- Advertisement -

महापुरुषांचा अपमान, महागाई, बेरोजगारी, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद अशा अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने उद्या, १७ डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाला आधी परवानगी मिळाली नव्हती. मात्र, आता या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास मिल ते जेजे ब्रिज मार्गे टाईम्स ऑफ इंडियापर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. टाइम्सच्या इमारतीसमोर मविआतील नेत्यांची भाषणे होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळाल्यास येथे सभा होईल.

हेही वाचा मविआच्या महामोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी मिळाली, पण ‘या’ अटी-शर्थींसह!

उद्याचा लढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसारखा

संयुक्त महाराष्ट्रासाठी असे लढे निघत असे. उद्या निघणारा महामोर्चा हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा लढा आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत उद्याच्या मोर्चाची माहिती दिली. तसेच, भाजपावरही टीकास्त्र सोडलं.

हेही वाचा – महामोर्चाची तुलना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी, विरोध करणाऱ्यांना संजय राऊत म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -