घरताज्या घडामोडी'शिवतीर्थ'वर राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दीड तास गुफ्तगू

‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात दीड तास गुफ्तगू

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी नारायण राणेंनी भेट घेतली. नारायण राणे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. यावेळी जवळपास दीड तास या दोघांमध्ये बातचित झाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी नारायण राणेंनी भेट घेतली. नारायण राणे सपत्नीक राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. यावेळी जवळपास दीड तास या दोघांमध्ये बातचित झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही काळ नारायण राणे आणि राज ठाकरे या दोघांच्या गॅलरीत गप्पा रंगल्याचे पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे या दोन नेत्यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. (Bjp Mp Narayan Rane Visits Mns Raj Thackeray Residence Shivtirtha)

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या काही काळापासून राज ठाकरेंची भाजपाशी जवळीक वाढल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यताही वर्तवली जाते.

- Advertisement -

या भेटीत मुंबई-गोवा महामार्गाविषयीही दोघांमध्ये बातचित झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नारायण राणे आणि राज ठाकरे यांची ही कौटुंबिक सदिच्छा भेट दीड तास रंगली होती. शिवतीर्थच्या गॅलरीमध्ये हे दोन्ही नेते काही काळ गप्पा मारताना दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच कोकण दौरा केला होता. या दौऱ्यात राज ठाकरेंनी नारायण राणे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती.


हेही वाचा – वरूण सरदेसाईंनी आरोप फेटाळले, मान्यताप्राप्त संस्थेत नोकरभरती…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -