घरदेश-विदेशमाजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन

माजी पोप बेनेडिक्ट यांचे निधन

Subscribe

माजी पोप बेनेडिक्ट (former-pope-benedict) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

माजी पोप बेनेडिक्ट (former-pope-benedict) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९५ वर्ष होते. बेनेडिक्ट यांनी नऊ वर्षांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत चढ उतार होता. अखेर आज सकाळी मैटर एक्लेसियामध्ये ९.३४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्हॅटीकन सिटीकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली. दरम्यान, सेंट पीटर्स बेसिलिका येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

पोप बेनेडिक्ट यांनी तब्येतीविषयक तक्रारीमुळे २०१३ मध्येच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे जगाच्या इतिहासात ६०० वर्षात पहील्यांदाच एका पोपने राजीनामा दिल्याची नोंद झाली य याआधी पोप ग्रेगरी बारावी यांनी १४१५ मध्ये पोप पदाचा राजीनामा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -