घरताज्या घडामोडीम्हाडाकडून पुण्यात 5,990 घरांची सोडत जाहीर; 'असा' करा अर्ज

म्हाडाकडून पुण्यात 5,990 घरांची सोडत जाहीर; ‘असा’ करा अर्ज

Subscribe

पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,990 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

पुण्यात घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,990 सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. म्हाडातर्फे तयार करण्यात आलेलं IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नव्या संगणकीय अॅपचा वापर करणारं पुणे मंडळ हे म्हाडाचं सर्वात पहिले मंडळ ठरलं आहे. (Pune MHADA announces release for 5990 flats how to apply)

पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांच्या हस्ते याला गुरुवारपासून सुरुवात झाली. नव्या प्रक्रियेनुसार नोंदणीकरतेवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे म्हाडाच्या विविध मंडळांच्या संगणकीय सोडतीतील कायमस्वरूपी पात्र अर्जदार ठरणार आहेत.

- Advertisement -

पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे. IHLMS 2.0 या अॅपच्या साहाय्यानं सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस गुरुवारी दुपारी १२.०० वाजेपासून सुरवात झाली. सायंकाळपर्यंत सुमारे ४,४०० अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेस सुरवात केली. ही नवीन प्रणाली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे. कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या ऍपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 हे अॅप अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे.

  • अर्जदारांच्या सोयीसाठी https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करण्यात आली आहे.
  • हे अॅप डाउनलोड करण्याची लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, व्हिडीओस, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
  • सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे.
  • IHLMS 2.0 या अॅपवर अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी पुणे मंडळाने जाहीर केलेल्या
  • सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात.
  • सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या अॅप वरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.
  • ६ फेब्रुवारी, २०२३ रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील.
  • ६ फेब्रुवारी, २०२३ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.
  • सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या अॅपद्वारे पात्र ठरविले जातील.
  • सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १५ फेब्रवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.

पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच अॅपमध्ये प्राप्त होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘चित्रपट उद्योग हलवा नाही की, डब्यात घालून…’; चित्रनगरीच्या राजकारणाला मनसेचा विरोध

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -